डोंबिवलीमध्ये पब्जी हा ऑनलाइन गेम खेळण्यासाठी विरोध केला म्हणून एका महिलेला तिच्याच सोसायटीतील शेजारच्या मंडळींनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी(दि.28) रात्री डोंबिवलीजवळ ठाकुर्ली येथील विशाल भोईर इमारतीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती वेदांत या महिलेने आपल्या इमारतीच्या जिन्यावर बसून पब्जी खेळणाऱ्या काही तरुण-तरुणींना विरोध केला. त्याच सोसायटीत राहणारे मनिष कदम यांची मुले ही जिन्यामध्ये पब्जी गेम खेळत बसायचे. दिप्ती यांनी त्यांना अनेकवेळा खेळण्यास मनाई केली होती. रविवारी रात्री ही मुले पब्जी गेम खेळत असताना दिप्ती यांनी त्यांना पुन्हा विरोध केला. याचा राग मनात धरून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कदम कुटुंबियांनी दिप्ती यांच्याशी भांडणाला सुरूवात केली. हे भांडण इतकं वाढलं की मीना कदम, मनीष कदम, मानसी कदम, आणि मानसीची मैत्रीण गरिमा त्रिवेदी यांनी दीप्ती यांना इमारतीतच बेदम मारहाण केली. जबर माराहण झाल्याने जखमी झालेल्या दीप्ती यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivali lady beaten up by family members over opposing for pubg playing sas
First published on: 30-07-2019 at 15:14 IST