Dombivali Thakurli Bridge will be closed on 21 and 22 February | डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपूल सोमवार व मंगळवारी वाहतुकीसाठी बंद | Loksatta

डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपूल सोमवार व मंगळवारी वाहतुकीसाठी बंद

डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपुलावर सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपूल सोमवार व मंगळवारी वाहतुकीसाठी बंद
ठाकुर्ली उड्डाणपूल, डोंबिवली (संग्रहित छायाचित्र)

डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. पुलावरील रस्त्याचे पुर्नपृस्ठीकरण व मास्टेकआस्फाल्ट कामासाठी सोमवारी (२१ फेब्रुवारी) रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवारी (२२ फेब्रुवारी) रात्री १२ वाजेपर्यंत ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

रस्ते देखभालीसाठी ठाकुर्ली उड्डाणपूल बंद करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी वाहतूक विभागाकडे केली होती.

या मार्गावरील वाहन चालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

पूल बंद राहणार असल्यामुळे घरडा सर्कल, मंजुनाथ शाळा, टिळक पुतळा मार्गे सावरकर रस्ता, नेहरू मैदान रस्ता मार्गे ठाकुर्ली उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स. वा. जोशी हायस्कूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गाने येणाऱ्या वाहन चालकांनी टिळक पुतळा येथून पाटणकर चौक (चार रस्ता) गिरनार चौक, म्हाळगी चौक, एस के पाटील शाळा मार्गे कोपर उड्डाणपुलावरून डोंबिवली पश्चिमेकडे जावे.

ठाकुर्ली उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनांसाठी सूचना

ठाकुर्ली गाव, ठाकुर्ली रेल्वे स्टेशन येथून ठाकुर्ली उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनांना नाना कानविंदे चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहन चालकांनी कानविंदे चौक येथून फडके रोड. इंदिरा चौक. ग्रीन चौक येथे उजवे वळण वि. शा. चिपळूणकर मार्ग. वा. दी. जोशी चौक. एस के पाटील शाळा येथून कोपर उड्डाण पुलाने डोंबिवली पश्चिमेत जावे.

हेही वाचा : “मी जे सांगते, ते…”, अमृता फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण; मुंबईत ट्रॅफिकमुळे घटस्फोट होत असल्याचं केलं होतं वक्तव्य!

डोंबिवली पश्चिम येथून ठाकुर्ली पुलाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बावन चाळ येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहन चालकांनी बावन चाळ येथे उजवे वळण घेऊन महात्मा गांधी रोड, भावे सभागृह रस्त्याने पंडित दिन दयाळ चौकातून कोपर उड्डाणपूल मार्गे डोंबिवली पूर्व भागात यावे. सर्व वाहन चालकांनी या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2022 at 20:20 IST
Next Story
Shiv Jayanti 2022 : जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही – फडणवीस