ठाणे : कोपरी स्मशानभूमीच्या नुतनीकरणामध्ये सभागृहाची उभारणी करण्यात येणार असून, यामुळे स्माशनभूमीची जागा कमी होणार असल्याने त्यास कोपरी स्मशानभूमी हितचिंतक नागरिक संघ व कोपरी संघर्ष समितीने विरोध केला आहे. स्माशनभूमीच्या जागेत सभागृहाची उभारणी नकोच अशी भूमीका घेत ही मागणी मान्य झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोपरी स्मशानभूमी हितचिंतक नागरिक संघ व कोपरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्मशानभूमीच्या जागेचे मुळ मालक दीपक ठाणेकर, चंद्रशेखर पवार, योगेश मालुसरे, नितीन पाटील, राजेश गाडे, संतोष सुर्वे, पांडुरंग दळवी, यमुना म्हात्रे हे उपस्थित होते. कोपरीची लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या घरात गेली आहे. येथील कोपरी गावात एकमेव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीकरीता १४०० चौरस मीटर जागा दिवंगत स्थानिक नागरिक विष्णू ठाणेकर यांनी दान केली होती. २०१३ मध्ये या स्मशानभूमीत एका ट्रस्टने सत्संगासाठी इमारत उभारण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यासाठी लहान मुलांची दफनभूमीची जागा हटवून चार मजली इमारत उभारण्याचा प्रयत्न केला होता. त्यास नागरिकांनी कडाडून विरोध केल्यानंतर पालिकेने इमारतीवर हातोडा मारला होता. त्यानंतर हे काम थांबले होते.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा – दिव्यात रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा, भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून ५८ कोटींचा निधी मंजूर

२०१९ मध्ये अशाप्रकारचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही विरोध होताच काम थांबले होते. त्यावेळी न्यायालयानेही संबधित ट्रस्टच्या विरोधात निर्णय दिला, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांनी स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून १२ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी महापालिकेला दिला होता. नागरिकांना विश्वासात घेऊन हे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या होत्या. परंतु स्मशानभूमीच्या नुतनीकरणामध्ये पालिकेने पुन्हा सभागृह इमारतीचा समावेश केला असून त्यास आमचा विरोध असल्याचे योगेश मालुसरे यांनी सांगितले. सभागृहाच्या इमारतीमुळे स्मशानभूमीची जागा कमी होऊन अंत्यविधीचे क्षेत्र घटणार आहे. त्यामुळे महापालिकेने ट्रस्टकडून स्मशानभूमीचा ताबा घेऊन पालिकेचे व्यवस्थापन नेमावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.