अवघ्या जगाला हादरवणारे पहिले महायुद्ध घडले तेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेल्या भारतात स्वातंत्र्यसमर सुरू होते. मात्र, तरीही अनेक भारतीय जवानांनी ब्रिटिश फौजेमधून या महायुद्धात सहभाग घेऊन आपल्या शौर्याचे दर्शन घडवले होते. या महायुद्धाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या भारतीय जवानांना स्मृतिवंदना देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दिल्लीत एक चित्रसंग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयात देशभरातून निवडलेल्या ११ चित्रकारांच्या चित्रांचा समावेश असून त्यात ठाण्यातील चित्रकार डग्लस जॉन यांचीही दोन चित्रे आहेत.
जगाचे राजकारण आणि अर्थकारण बदलणाऱ्या पहिल्या महायुद्धात भारतीय जवानही सहभागी झाले होते. यापैकी अनेक ज्ञात-अज्ञात जवानांनी परकीय भूमीवर शौर्य गाजवत वीरमरण पत्करले. अशाच ज्ञात जवानांच्या शौर्याची गाथा सांगणारे प्रसंग चित्रांतून दर्शवण्यासाठी दिल्लीमध्ये एक चित्रसंग्रहालय उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी घेतलेल्या एका विशेष कार्यशाळेतून देशभरातील ११ चित्रकारांची निवड करण्यात आली. यामध्ये ठाण्यात राहणारे डग्लस जॉन यांचाही समावेश आहे. डग्लस यांची दोन चित्रे या संग्रहालयासाठी निवडण्यात आली आहेत. जर्मनीच्या सीमेवर आपल्या तुकडीतील जायबंद सैनिकांना परत आणण्यासाठी रायफलमन कुलबीर थापा यांनी दाखवलेल्या धैर्याचे दर्शन घडवणारे चित्र जॉन यांनी काढले आहे, तर दुसरे चित्र गुरखा रेजिमेंटच्या जवानांच्या शत्रूसोबतच्या समोरासमोरील लढाईचे आहे.  गुरखा रेजिमेंटमधील रायफलमॅन असलेले कुलबीर थापा यांची नियुक्ती जर्मन सीमेवर होती. यावेळी झालेल्या चकमकीत त्यांच्या तुकडीचे काही सैनिक जर्मनीच्या बाजूला जखमी अवस्थेत पडले होते. अशा वेळी जिवाची पर्वा न करता थापा यांनी पहाटेच्या धुक्यामध्ये शत्रुपक्षाच्या बाजूला घुसून तेथून आपल्या सैनिकांना बाहेर उचलून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही धडपड पाहून जर्मन सैनिकांनीही टाळय़ा वाजवून त्यांचे कौतुक केले. पहिल्या महायुद्धात गुरखा रेजिमेंटच्या सैनिकांची शत्रुपक्षाशी समोरासमोर गाठ पडली. तेव्हा तुंबळ युद्ध झाले. युद्धाचे वर्णन आणि सैनिकाची जुनी छायाचित्रे या आधारावर जॉन यांनी ही चित्रे हुबेहूब रेखाटली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणापासूनच चित्रकलेची आवड

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drawing of artist in thane will be in delhi at first world war memorial
First published on: 17-06-2015 at 12:14 IST