कल्याण – कल्याण पूर्व भागातील मलंग रस्ता, कोळसेवाडी, चिंचपाडा, काटेमानिवली या वर्दळीच्या भागातील रस्त्यांवर उभारण्यात आलेले फटाक्यांचे स्टाॅल सोमवारी आय, ड प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या पथकाने जमीनदोस्त केले. हे स्टाॅल पुन्हा उभारले तर १८८४ च्या विस्फोटक कायद्याने विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली.

कल्याण पूर्व भागातील चेतना विद्यालय ते मलंगगड, नेवाळी या वर्दळीच्या रस्त्यावर, चिंचपाडा, काटेमानिवली, कल्याण पूर्व रेल्वे स्थानक रस्ता, कोळसेवाडी, विजयनगर, खडेगोळवली भागातील वर्दळीच्या रस्त्यांवर, अंतर्गत गल्ल्यांमध्ये, निवासी भागात विक्रेत्यांनी पालिकेच्या परवानग्या न घेता फटाके विक्रीची दुकाने सुरू केली आहेत, अशा तक्रारी नागरिकांकडून आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्याकडे आल्या होत्या.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
Dombivli east, Assistant Commissioner, Notice, Illegal Shop Construction, block road, old jakat naka, gandhi nagar road, kalyan dombivali municipal corporation,
डोंबिवलीत रस्ते अडवून बेकायदा गाळ्यांची उभारणी, ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून नोटीस

या दोन्ही अधिकाऱ्यांनी सोमवारी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरून संयुक्त मोहीम हाती घेऊन आय, ड प्रभागात वर्दळीच्या, अंतर्गत रस्ते भागातील फटाक्यांचे सर्व स्टाॅल्स पाडकाम पथकाकडून भुईसपाट केले. कारवाई सुरू झाल्यानंतर विक्रेत्यांची दाणादाण उडाली. तोडण्यात आलेले स्टाॅल पुन्हा उभारले तर विस्फोटक कायद्याचा आधार घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, अशी तंबी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी रस्त्यावर बेकायदा फटाके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दिली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची अभ्यासिका खासगी संस्थेला देण्याचा घाट?

न्यायालयाचा अवमान

मुंबई उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये फटाके विक्रीसंदर्भात दाखल याचिकेवर निर्णय देताना सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, निवासी विभागात फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. फटाके विक्री ही मोकळी मैदाने, पटांगणावर झाली पाहिजे. यासाठी महापालिकांनी या विक्रेत्यांना साठा, विक्रीसाठी आवश्यक परवानग्या देण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. जे विक्रेते या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर विस्फोटक अधिनियम १८८४ च्या तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या गृह विभागाने या कार्यवाहीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेला २१ ऑक्टोबर २०१६ रोजी एक पत्र पाठविले आहे.शासन, उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर बेकायदा फटाके विक्री सुरू आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली: भागशाळा मैदानावरील फटाक्यांच्या स्टॉलला नागरिकांचा विरोध, पालिका आयुक्तांना सामाजिक कार्यकर्त्याचे पत्र

“ कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्ता, रेल्वे स्थानक परिसरातील सर्व रस्त्यांवर आय, ड प्रभागाकडून संयुक्त कारवाई करून फटाके विक्रीचे स्टाॅल जमीनदोस्त केले. हे स्टाॅल पुन्हा उभारले. तेथे काही दुर्घटना घडली तर संबंधितांवर विस्फोटक कायद्याने गुन्हे दाखल केले जाणार आहेत.”- हेमा मुंबरकर,साहाय्यक आयुक्त, आय, प्रभाग. कल्याण.