खासगी हवामान अभ्यासकांनी नोंदवलेल्या अंदाजानुसार बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पंधरा मिनीटे पावसाच्या सरी कोसळल्या. या सरींमुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

हेही वाचा- कल्याण डोंबिवली पालिकेला उर्जा बचतीचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार; रुग्णालय संवर्गातही प्रथम पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराच अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. सुरूवातीचे आठ ते दहा मिनीटे जोरदार पाऊस झाला. त्यानंतर काही मिनीटे हलक्या पावसाच्या सरी पडत होत्या. अचानक आलेल्या पावसामुळे कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांची धावपळ झाली. अनेकांनी लपण्यासाठी दुकाने, झाडांचा आधार घेतला. यापूर्वी २२ ऑक्टोबरला शेवटचा पाऊस पडला होता. त्यानंतर आज डिसेंबर महिन्यातला पहिला पाऊस पडला. गेल्या आठवड्यातच या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. चक्रीवादळामुळे अरबी सुमुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडला, असेही मोडक यांनी सांगितले आहे. या पावसामुळे गेल्या काही दिवसात हवेत असलेली धुळ मात्र जमिनीवर आली.