लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर भागातील वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा मानल्या जाणाऱ्या ढोकाळी ते कोलशेत या रस्त्याचे काम महापालिका आणि महावितरण कंपनीच्या वादामुळे रखडले आहे. या रस्त्याच्या कामात बाधित होणारे विद्युत खांब, वाहिन्या आणि रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी १२ कोटींचा निधी द्यावा अशी मागणी महावितरण कंपनीने महापालिकेकडे केली आहे. परंतु महापालिकेकडून हा निधी उपलब्ध होत नसल्याने या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. येथील अरुंद रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

Police destroyed Robbers Abandoned Houses, Robbers Using Abandoned Houses to stay, Robbers Using Abandoned hide, Houses to stay, Navi Mumbai, Kopar Khairane Area, robbers in kopar khairane,
जनसहभागातून गर्दुल्ल्यांचा अड्डा उद्ध्वस्त, कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी 
Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने महत्वाचे रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये ढोकाळी ते कोलशेत या रस्त्याचाही समावेश होता. या भागात मोठया प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे वाहन संख्येतही मोठी वाढ झाली आहे. घोडबंदर मार्गावरुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या मार्गावर मेट्रो तसेच उड्डाणपूलांची कामेही सुरु आहेत. त्यामुळे या मार्गावर दररोज मोठी वाहनकोंडी होत असते. या वाहतूक कोंडीचा फेरा टाळण्यासाठी वाहनचालक ढोकाळी ते कोलशेत या पर्यायी रस्त्याचा वापर करत असतात. गेल्या काही महिन्यांपासून या पर्यायी रस्त्यावरील वाहतूक मोठया प्रमाणावर वाढली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील कर्करोग रुग्णालय रखडले, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

काम रखडले, कोंडीचा फेरा कायम

वाहन संख्येच्या तुलनेत ढोकाळी ते कोलशेत हा रस्ता अपुरा पडत असल्याने या मार्गावर कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी पालिकेने मार्च २०१९ मध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले. या कामासाठी २६ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. ४० मीटर रुंद आणि १२०० मीटर लांबी असे या रस्त्याचे काम करण्यात येणार होते. दोन्ही बाजुला प्रत्येकी चार मार्गिका आणि त्यापैकी दोन काँक्रीट तर, दोन डांबरी मार्गिका करण्याचे नियोजन होते. त्यापैकी काँक्रीटच्या मार्गिकेचे काम झाले आहे. उर्वरित डांबरी मार्गिकांचे काम रखडले आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या दोन काँक्रीटच्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू आहे.

काम रखडण्याचे कारण

ढोकाळी ते कोलशेत रस्त्याच्या बाजुला महावितरणचे विद्युत खांब, वाहिन्या आणि रोहित्र आहेत. रस्ते कामात हे सर्व बाधित होत असून ते स्थलातरित करण्यासाठी महावितरणने पालिकेकडे १२ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. महापालिकेच्या तिजोरीत निधीच नसल्यामुळे पालिकेने अद्याप महावितरणला पैसे दिलेले नाहीत. यामुळे हे काम रखडले आहे.

आणखी वाचा-उधळलेल्या रेड्याचा कल्याणमध्ये धुमाकूळ

रस्ते कामात बाधित होणारे विद्युत खांब, वाहिन्या आणि रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. -प्रशांत सोनाग्रा, नगरअभियंता, ठाणे महापालिका

ढोकाळी ते कोलशेत या रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरीकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. या कामासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी केली आहे. शहरातील रंगरंगोटी तसेच इतर महत्वाची नसलेली कामे बाजूला ठेवून महापालिकेने या रस्ते कामासाठी प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. -संजय केळकर, आमदार, ठाणे शहर