ठाणे : ठाणे महापालिकेच्या जाहिरात शुल्काची रक्कम थकविणाऱ्या विविध होर्डिंगधारकांचे जाहिरात फलक उतरविण्याची कारवाई पालिका प्रशासनाने केली. या कारवाईच्या दणक्यानंतर होर्डिंगधारकांनी ६३ लाखांची थकीत रक्कम पालिकेकडे जमा केली आहे.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात एकच तिकीट खिडकी उघडी ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांचा रांगा

हेही वाचा – वर्सोवा-विरार सागरी सेतू : मच्छिमारांचे मने वळविण्यासाठी एमएमआरडीएचे मत्स्य व्यवसाय विभागाला साकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, चौकात मोठे होर्डिंग उभारण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यापोटी महापालिका संबंधित होर्डिंगधारकांकडून जाहिरात शुल्क वसूल करते. परंतु काही होर्डिंगधारकांनी हे शुल्क थकविले होते. त्यांच्यावर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत, जाहिरात फी थकविलेल्या १८ होर्डिंगवरील जाहिरातींचे फलक उतरवण्यात आले. ही कारवाई सहायक आयुक्त अलका खैरे यांच्या नेतृत्वात जाहिरात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईनंतर, जाहिरातदारांनी त्यांच्याकडे थकीत असलेली ६३ लाख रुपयांची थकीत रक्कम जमा केल्याची माहिती जाहिरात विभागाचे उपायुक्त महेश सागर यांनी दिली.