बदलापूरजवळील पिंपळोली गावात राहणाऱ्या पांडुरंग फराड यांच्या घरावर ६०-७० जणांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
हल्लेखोरांनी घरातील महिलांना मारहाण करून सामानाची मोडतोड केली आणि ४५ तोळे सोने व साडेचार लाखांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी दुपारी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी सुधीर जाधव याला ताब्यात घेतले आहे. फराड यांच्या शेतजमिनीवरून त्यांचा गावातील सुधीर जाधव यांच्याशी शनिवारी सकाळी वाद झाला होता.