विविधतेतून एकता हे भारताचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. भाषा, रीतिरिवाज, पेहेरावाप्रमाणेच येथील खाद्यसंस्कृतीतही कमालीचे वैविध्य असते. त्यामुळे प्रदेशांगणिक येथे निरनिराळ्या पदार्थाची चव चाखायला मिळते. उदा. महाराष्ट्राची झुणका-भाकरी, पंजाबचे पराठे, गुजरातची जिलेबी-फाफडा. आता महानगरी संस्कृतीत निरनिराळ्या प्रांतातील पदार्थ एकाच ठिकाणी मिळण्याची सोय झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गुजरातमध्ये मलाई मावा गोळा मोठय़ा प्रमाणात खाल्ला जातो. गुजरातची ही खास थंडाई आता डोंबिवलीतही उपलब्ध झाली आहे. गुजरात गोळा एक्स्प्रेस नावानेच उन्हाची काहिली कमी करणारा हा गोळा मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बर्फाचा गोळा तसा आपल्याला नवीन नाही. उन्हाळ्याच्या दिवसात किसलेल्या बर्फाच्या गोळ्यावर निरनिराळ्या रंगांची सरबते फवारून खाण्याची पद्धत आपल्याकडे प्रचलित आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना हा बर्फाचा गोळा खूप आवडतो. उन्हाळ्याच्या दिवसात चौपाटीवर बर्फाचा गोळा विकणाऱ्या अनेक गाडय़ा लागलेल्या असतात. आता सर्वत्र आईस्क्रीमची चलती असली तरी या बर्फाच्या गोळ्याचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. बांबूच्या काडीला लावून अथवा सरळ ग्लासात घेऊन चमच्याने हा गोळा खाल्ला जातो.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous gola outlets in dombivli
First published on: 22-04-2017 at 02:43 IST