बदलापूर पूर्वेतील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत तीन कामगार होरपळले. गगनगिरी फार्मा केम असे या कंपनीचे नाव असून रविवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली.कंपनीत आयपीए प्रकारातील रसायने तयार केली जातात. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या कंपनीत आग लागली. तिने रौद्र रूप धारण केले. याची माहिती मिळताच कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे भीषण स्वरूप लक्षात घेऊन आनंद नगर एमआयडीसी, अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आदींच्या अग्निशमन दलांनाही पाचारण करण्यात आले होते. पाच अग्निशमन वाहने, दहा पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझवण्यात आली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ११.२० ते संध्याकाळी ४.२० पर्यंत सलग चार तास अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली. मात्र तीन कामगार जखमी झाले. तर या घटनेनंतर पहिल्या माळय़ावरून उडय़ा मारून बाहेर पडल्याने दोन कामगारांना दुखापत झाली.

Permits ethanol production from residual seed heavy plants Kolhapur
शिल्लक बी हेवी मळी पासून इथेनॉल निर्मितीस परवानगी; साखर उद्योगाला मोठा दिलासा
Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर

अनर्थ टळला..
गगनगिरी फार्मा केम प्रा.लि. कंपनीत ‘आयपीए सॉलव्हंट’ या रसायनाची साठवण टाकी होती. त्याला क्लोरिन वायू जोडलेला असतो. या टाकीपर्यंत आग पोहोचली असती किंवा वायू गळती झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. तिथपर्यंत आग पोहोचू नये यासाठी शैलेश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले.