अंबरनाथ पश्चिमेत बंद पडलेल्या एका कंपनीत रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली. परिसरात पाला-पाचोळा असल्याने ही आग पसरली. परंतु जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर ही आग विझवण्यात आली.
धरमसी मोरारजी केमिकल असे या बंद असलेल्या कंपनीचे नाव असून कंपनीच्या परिसरात असलेल्या झाडाझुडपांना ही आग लागली. या आगीमुळे शेजारच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरले होते. काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र सुखा पाला पाचोळा मोठ्या प्रमाणावर असल्याने आग पसरली होती. कंपनी बंद होऊन अनेक वर्षे झाली असल्याने यात कोणतीही वास्तू आगीत आली नाही. तसेच कोणतीही जीवितहानी अथवा नुकसान झालेले नाही.