इमारतीचे छत कोसळून पाच जणांचा मृत्यू

बचाव पथकांनी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले.

उल्हासनगरमधील दुर्घटना

ठाणे : उल्हासनगर येथील नेहरू चौक भागात शुक्रवारी इमारतीचे छत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखी तीन ते चार जण अडकल्याची शक्यता बचाव पथकांनी व्यक्त केली.

नेहरू चौक येथील बडोदा बँकेजवळ साईशक्ती ही पाच मजली इमारत आहे. शुक्रवारी रात्री १०.३०च्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्याचे छत थेट तळमजल्यापर्यंत कोसळले. या दुर्घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन दल दुर्घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Five killed as building slab collapses akp