छोट्या दोन ‘बीएचके’ घरांकडे ग्राहकांचा ओढा; खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून सवलती


ठाणे : वस्तू आणि सेवा कर, मुद्रांक शुल्कामधील सवलती, मंदीच्या सावटामुळे बांधकाम व्यावसायिकांनी आखलेल्या वेगवेगळ्या सवलत योजना यामुळे ठाणे, बदलापूर आणि डोंबिवली या शहरांमध्ये वर्षभरात घरांच्या किमतीमध्ये जवळपास पाच टक्क््यांची घट झाल्याचा दावा ‘नाइट फ्रँक’ या रिअल इस्टेट क्षेत्रातील घडामोडींची पहाणी करणाऱ्या संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात घरांच्या विक्रीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी वेगवेगळ्या सवलतींच्या माध्यमातून अनेक बांधकाम व्यावसायिक अजूनही खरेदीदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्ना करत आहेत. या पाहणीनुसार, पूर्वी एक बेडरूम हॉल किचन (वन बीएचके) घरासाठी प्रयत्न करणाऱ्या मध्यमवर्गीयांनाही आता दोन बीएचके घरांची ओढ लागली असून तशी घरे उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिक कमी क्षेत्रफळाची पण दोन शयनगृहे असलेल्या सदनिका उभारणीला महत्त्व देऊ लागले आहेत.

‘नाइट फ्रँक’ या कंपनीने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे, घर खरेदी करणाऱ्यांना वस्तू आणि सेवा कर, मुद्रांक शुल्कामध्ये मिळणाऱ्या सवलती, घराची नोंदणी करताना देण्यात येणाऱ्या सूट, विविध योजना यांमुळे घरांच्या किमतीमध्ये घट झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.  बदलापूरमध्ये सध्या २ हजार ७०० ते ३ हजार ५००, डोंबिवली ४ हजार ५०० ते ६ हजार, घोडबंदर येथे ६ हजार ते १० हजार आणि नौपाडा क्षेत्रात १४ हजार ते १८ हजार रुपये प्रति चौ. फूट इतकी घराची किंमत झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नौपाडा क्षेत्रात सर्वाधिक पाच टक्के, त्यानंतर घोडबंदरमध्ये चार टक्के, बदलापूर दोन टक्के आणि डोंबिवली क्षेत्रात एका टक्क्याने घराच्या किमतींमध्ये घट झाल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच करोनाकाळातही घरांची विक्री होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

नव्या प्रकल्पांमध्ये वाढ

करोनाच्या कालावधीमध्ये २०२० मध्ये मार्च महिन्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे २०२० मधील जानेवारी ते मार्च या कालावधीत कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी आणि कर्जत या क्षेत्रात ४ हजार ७२५ नवे घरे बांधण्यात आली. तर ५ हजार ५४३ घरे विक्री झालेली होती. याच कालावधीत २०२१ मध्ये या भागात ८ हजार ८ नवी घरे बांधण्यात आली तर, ७ हजार १३६ घरांची विक्री झालेली आहे. ठाणे शहरतील नौपाडा, घोडबंदर, पोखरण, माजीवडा, खोपट आणि पाचपाखाडी भागात २०२० मध्ये जानेवारी ते जून या कालावधी ४ हजार २७४ घरे बांधण्यात आली तर २ हजार ५० घरे विœी केली. २०२१ मध्ये या भागात ५ हजार १०२ घरे बांधली गेली, तर ४ हजार ३८९ घरांची विक्री झाल्याचेही अहवालात समोर आले आहे.

कमी किमतीत दोन शयनगृहे

दोन शयनगृहे असणारे घर घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी गेल्या काही वर्र्षांत ‘कॉम्पॅक्ट टू बीएचके’ अर्थात कमी क्षेत्रफळातील दोन शयनगृह असलेल्या घरांचा पर्याय पुढे आणला जात आहे. घोडबंदर तसेच ठाण्यात एरवी दोन ऐसपैस शयनगृहाचे घर खरेदी करण्यासाठी एक ते दीड कोटी रुपयांची किंमत ग्राहकांना मोजावी लागत असे. या घरांचा आकार प्रत्यक्ष वापरात ८०० ते ९०० चौरस फूट इतका असे. इतक्या किंमतीची घरे परवडत नसल्याने एका शयनगृहाच्या घरात राहणाऱ्या अनेकांना मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण करणे कठीण होत असे. अशा ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवत घोडबंदर पट्ट्यात ६५० ते ८०० चौरस फुटाचे कॉम्पेक्ट टू बीएचकेची संकल्पना जोरात पुढे आणली जात आहे. कासारवडवली, बाळकूम, कोलशेत, गायमुख या पट्ट्यात ही घरे ८५ लाखापासून एक कोटीपर्यत विकली जात आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goods and services tax concessions in stamp duty night frank real estate one bhk akp
First published on: 29-07-2021 at 00:06 IST