कल्याण- कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील तलावात गेल्या दोन दिवसांपासून शेकडो मासे मृत पावल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुसळधार पाऊस पडत असताना आजुबाजुच्या भागातील प्रदुषित पाणी तलावात शिरल्यामुळे ही घटना घडली असण्याचा प्राथमिक अंदाज या भागातील नागरिकांकडून काढला जात आहे.

मागील वर्षी गौरीपाडा तलावात ८० हून अधिक मृत कासवे तलावाच्या काठाला तरंगली होती. त्यावेळीही तलावाच्या पाण्याविषयी संशय घेण्यात आला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या तलावाचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. आता गेल्या दोन दिवसांपासून गौरीपाडा तलावात मृत मासे तरंगून काठाला येत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचे आणि परिसरातील गटार, नाल्यातील सांडपाणी, रसायन मिश्रीत पाणी तलावात आले असण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून वर्तवली जात आहे. रसायन मिश्रीत पाणी तलावात येऊन मृत माशांना त्याची बाधा झाली असण्याची स्थानिकांनी वर्तवली. दरवर्षी या तलावात गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते.

हेही वाचा >>>जैतापूर आणि नाणार या प्रकल्पांचा विरोध समजून घेणे आवश्यक; जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर

हेही वाचा >>>देशाबाबत वाईट गोष्टींना जास्त प्रसिद्धी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार समजताच काही पर्यावरणप्रेमी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. माशांच्या मृत्युचे कारण शोधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या घटनेची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गौरीपाडा तलाव परिसरात विविध प्रकारची जैवविविधता आहे.