कल्याण – टिटवाळा पूर्व भागातील गणेशनगर, आर. के. नगर परिसरात भूमाफियांनी उभारलेल्या ४० हून अधिक बेकायदा चाळी, चाळींचे जोते अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने साहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत भुईसपाट केले. टिटवाळा, मांडा परिसरातील बेकायदा चाळींच्या बाबतीत पालिकेत तक्रारी वाढल्याने या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

टिटवाळा पूर्व भागातील गणेशनगर, आर. के. नगर भागात सर्वाधिक बेकायदा चाळी, या भागात चाळी उभारणीसाठी नवीन जोती बांधण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना मिळाली होती. या बेकायदा चाळींची प्रत्यक्ष पाहणी करून झाल्यानंतर आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त रोकडे, अधीक्षक नंदकिशोर वाणी यांच्या तोडकाम पथकाने गणेशनगर, आर. के. नगर भागात जाऊन तेथील बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. यामध्ये ४० हून अधिक चाळी आणि जोत्यांची बांधकामे तोडण्यात आली.

drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
High Court question Home Department and Director General of Police to take action against illegal loudspeakers at religious places mumbai news
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा
Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
thieves stole Metro pole in Shivajinagar area are arrested
शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड

हेही वाचा – रामदास कदमांनी कोकणासाठी ४० वर्षांत कोणते दिवे लावले? सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची खरमरीत टीका

टिटवाळा भागातील बनेली, बल्याणी भागात गेल्या दहा वर्षांच्या काळात याभागातील टेकड्या, डोंगर खोदून भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारल्या आहेत. टिटवाळा भागात बेकायदा बांधकामांच्या विरोधात जोरदार तोडकाम मोहीम सुरू झाल्याने भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा – “सामाजिक परिवर्तनात साहित्यिकांची भूमिका महत्वाची”, प्राध्यापक संतोष राणेंचं वक्तव्य

टिटवाळा, मांडा परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळी तोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ही बेकायदा चाळी, गाळ्यांची बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जातील. काही चाळींमध्ये रहिवास असल्याने ही बांधकामे पावसाळ्या संपल्यानंतर तोडण्याची मोहीम सुरू केली जाईल. प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. – संदीप रोकडे, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग, टिटवाळा.

Story img Loader