बदलापूर: इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागत ६० हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या अंबरनाथच्या निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांच्यासाठीही ही लाच मागण्यात आली होती.

हे ही वाचा… कडोंमपामधील ५८ बेकायदा इमारतींना तूर्त दिलासा, महापालिकेच्या तोडकाम कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्त अंतरिम स्थगिती

हे ही वाचा… बदलापूरमध्ये महिलेवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहकारी संस्था निबंधक कार्यालयातील अनेक तक्रारी गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत. यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकत्याच लावलेल्या एका सापळ्यात सहाय्यक निबंधक आणि कनिष्ठ लिपिक अडकले आहेत. तक्रारदार त्यांच्या इमारतीची गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणी करण्यासाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी लोकसेवक कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील यांनी त्यांच्यासाठी आणि वरिष्ठ अधिकारी दुय्यम निबंधक यांच्यासाठी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ६० हजार रुपये रक्कम ठरवण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. या सापळ्यात विजयसिंह पाटील यांनी ६० हजार रुपये रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली म्हणून अडकले. त्यामुळे विजयसिंह पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. ही रक्कम स्वीकारण्याकरिता सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांच्यावरही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.