डोंबिवली : येथील डोंबिवली जीमखान्याच्या मैदानात स्टेडियम उभारणीसाठी २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या निधीमुळे अनेक वर्ष स्टेडियम उभारणीसाठी प्रयत्नशील असलेल्या जीमखाना व्यवस्थापनाचे आणि त्याच बरोबर खेळाडुंचे स्वप्न साकार होणार आहे. डोंबिवलीत सुससज्ज स्टेडि्अम नसल्याने क्रिकेटसह अनेक प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांसाठी क्रीडा विषयक संस्थांना ठाणे, मुंबईतील स्टेडियमध्ये जावे लागते. डोंबिवली जीमखान्यात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने विविध खेळ प्रकारातील खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील आरक्षित भूखंडांचा खासगीकरणातून विकास करा – आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड

eknath shinde, Thane, eknath shinde latest news,
मुख्यमंत्र्यांची ठाण्यासाठी मोर्चेबांधणी
PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले, “देशाला लुटण्याची योजना…”
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

स्टेडियम उभारणी करताना बॅडमिंटन, टेबल टेनिस, जाॅगिंग ट्रॅक अशा विविध सुविधांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे, काही वर्षांपासून डोंबिवली जीमखान्यामध्ये स्टेडियम उभारणीला परवानगी द्यावी म्हणून जीमखाना व्यवस्थापनाने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यापूर्वी नगरविकास मंत्री असताना त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आणला होता. त्यामुळे यावेळी डोंबिवली जीमखान्याला भेट देताना यापू्वीची माहिती लक्षात ठेऊन हा निधी जाहीर केला आहे, असे डोंबिवली जीमखान्याचे सचिव पर्णाद मोकाशी यांनी सांगितले. स्टेडियम उभारणी संदर्भातील सविस्तर आराखडा या भूखंडाची नियंत्रक एमआयडीसी विभागाला सादर केला आहे. त्यामध्ये काही बदल करून नवीन आराखडाही दाखल करण्यात आला आहे. एक रकमी निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याने स्टेडियम उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे काम बांधकाम आराखडे अंतीम मंजुरीनंतर तात्काळ सुरू केले जाईल, असे जीमखान्याचे अध्यक्ष दिलीप भोईर यांंनी सांगितले.