scorecardresearch

Premium

ठाण्यात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

राज्याच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने बुधवारी काम बंद आंदोलन करत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले होते.

thane district, health contract employees, Strike
ठाण्यात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ठाणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय रुग्णालयात भरती झालेल्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे तसेच समान काम समान वेतन मिळण्यासाठी राज्याच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने बुधवारी काम बंद आंदोलन करत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले होते. येत्या अधिवेशनात २३ हजार कर्मचाऱ्यांचा मोर्चा नागपूर येथे धडक देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा… ठाण्यातील गायमुख चौपाटीचा काही भाग खचला, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात लावण्यात आली धोकापट्टी

GR cancellation of police leave encashment bandh Home Ministry take step back
…अखेर गृहमंत्रालयाने घेतली माघार; पोलिसांच्या रजा रोखीकरण बंदचा जीआर रद्द
hospital of Ulhasnagar
उल्हासनगरचे अत्याधुनिक रुग्णालय नागरिकांच्या सेवेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण
Ahmednagar lawyers gate Collector office
नगरमध्ये मोर्चेकरी वकील चढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर; फेकल्या पाण्याच्या बाटल्या!
Jalgaon people morcha
या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव दुमदुमले, प्रलंबित प्रश्‍नांसाठी लोकसंघर्षचा बिर्‍हाड मोर्चा

हेही वाचा… ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध शासकीय रुग्णालयात गेले १५ ते १६ वर्ष कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य सेवा देत आहेत. करोना काळातही केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. परंतु तूटपूंजे मानधन मिळत असल्याचा आरोप अधिकारी- कर्मचारी करत आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करावे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने आझाद मैदान येथे मागील महिन्यात आक्रोश आंदोलन पुकारले होते. त्यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेऊन यापुढे शासकीय भरतीमध्ये ३० टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली. परंतु, अद्याप लेखी स्वरुपात कोणतेही शासन निर्णय प्राप्त झालेले नाहीत. यानंतरही अनेकदा मंत्रिमंडळ बैठका झाल्या, मात्र शासन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या मागण्याकडे सकारात्मक प्रतिसाद देत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरुच ठेवले आहे. या कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करत ठाणे जिल्हा आरोग्य विभाग ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांना मागण्याचे निवेदन दिले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In thane district health contract employees on strike asj

First published on: 29-11-2023 at 19:36 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×