ठाणे : नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला अनेकजण मद्य सेवन करून वाहन चालवित असतात. त्यामुळे वाहन घेऊन आलेल्या चालकांना मद्य देणे टाळावे असे आवाहन ठाणे पोलिसांनी बार आणि हाॅटेल मालकांना केले आहे. वाहन चालकाला मद्य दिल्यास त्या वाहन चालकांना घरी सोडण्याची जबाबदारी बार किंवा हाॅटेल मालकांची असेल अशी सूचना ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी केली आहे.

नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्ट्यांसाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील विविध हाॅटेल, बारमध्ये मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांसाठी मुंबई तसेच जवळपासच्या शहरांमधून देखील नागरिक त्यांच्या वाहनाने येत असतात. अनेकदा वाहन चालविणारा व्यक्ती मद्याचे सेवन करतो. त्यामुळे वाहन चालविताना अपघाताच्या घटना घडत असतात. मद्यपी वाहन चालकांमुळे इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी बार आणि हाॅटेल मालकांची एक बैठक घेतली.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात वेठबिगारी सुरूच; अवघ्या पाच हजार रुपयांसाठी वीटभट्टीवर कातकरी दाम्पत्याला आठ वर्ष राबविले

या बैठकीला हाॅटेल संघटनांचे प्रतिनिधी, बार आणि हाॅटेल मालक उपस्थित होते. यावेळी राठोड यांनी बार आणि हाॅटेल मालकांना विविध सूचना केल्या. मद्य सेवनासाठी वाहन घेऊन येणाऱ्या व्यक्तीला मद्य देणे टाळावे. जर त्या व्यक्तीने मद्य सेवन केले असेल तर त्या व्यक्तीला घरी सोडण्याची जबाबदारी बार किंवा हाॅटेल मालकांची असेल. बार आणि हाॅटेल मालकांनी अशा मद्यपींसाठी वाहन चालक उपलब्ध करून द्यावा किंवा त्याला टॅक्सी, रिक्षाने घरी सोडावे असे आवाहन राठोड यांनी केले आहे. मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही राठोड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : कल्याणमध्ये ज्येष्ठ नागरिकाची १४ लाखांची फसवणूक

ढाब्यांवर कारवाई

काही दिवसांपासून ठाण्यातील हाॅटेल आणि ढाब्यांवर ग्राहकांना विनापरवाना मद्य उपलब्ध करून दिले जात आहे. अशा ढांब्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हाॅटेल व्यवसायिकांनी केली होती. त्यानुसार, ठाणे शहरातील येऊर, घोडबंदर आणि कोलशेत भागात ठाणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये २५ हाॅटेल आणि ढाब्यांवर कारावाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : ठाणे : घोडबंदर मार्गावर अपघातामुळे कोंडी

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात एका मद्य विक्री करणाऱ्या दुकानात ‘केवळ संरक्षण सेवांसाठी’ असा मजकूर असलेल्या मद्याची अवैध विक्री होत असल्याचे समोर आले आहे. याची माहिती या परिसरातील एका नागरिकाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर मनसेने यासंदर्भात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु यावर ठोस अशी कारवाई झालेली नाही असा आरोप मनसेने केला. येत्या आठ दिवसात कायदेशीर कारवाई झाली नाही तर, मनसे न्यायालयात जाईल, असा इशारा मनसे प्रभागाध्यक्ष अमोल राणे यांनी दिला आहे.