ठाणे : आपण अयशस्वी होत असल्याचे लक्षात आल्यावर दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडणे, हे त्यांचे पहिल्यापासून काम आहे, अशी टीका करत शरद पवार यांनी एकदा तरी मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचे दाखवून द्यावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. नागपूर येथील भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या ‘महाविजय २०२४’ मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यात मोठी आंदोलने चालली आहेत. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला होता, असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. त्याला राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

हेही वाचा : टिटवाळा येथे मेलच्या धडकेत मोटरमनचा जागीच मृत्यू

महाराष्ट्राचा राजकारण व्यवस्थित अभ्यासले तर गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपण अयशस्वी झालो की त्याचे खापर हे शरद पवार यांच्या नावावर फोडायचे. ही जुनीच पध्दत आहे. धनगरांना आरक्षण देणार होता आणि तेही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत. पण, त्यांना अद्याप आरक्षण देऊ शकले नाही. मुस्लिम तसेच लिंगायत समाजाला आरक्षण देऊ शकले नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ असे सांगितले होते. तारीख जवळ आली तरी आरक्षणाबाबत काहीच झालेले नाही. त्यांनी दिलेली प्रत्येक आश्वासने फेल झाली आणि त्यामुळे विषयाला बगल देण्यासाठी शरद पवार यांचे नाव घेत आहेत, अशी टीका आव्हाड यांनी केली.

हेही वाचा : कल्याण शहर मनसेच्या महिला अध्यक्षा गॅस सिलेंडर स्फोटात गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द्वेष आणि समाजात भांडण लावण्याची क्रिया, ही अयशस्वी होत असल्यामुळे तुम्ही बिथरले आहात. यामुळेच तुम्ही शरद पवार यांचे नाव घेत आहात, अशी टीकाही त्यांनी केली. सर्व आश्वासने फेल झाल्यामुळे ही आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता शरद पवार यांचे नाव घेत आहे. पण लोकांना माहिती यात शरद पवार यांचा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.