ठाणे : मध्य प्रदेशातील बुरहानपुर भागातून तयार करण्यात येणारी अवैध अग्निशस्त्र ठाण्यात विक्रीसाठी येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. नुकत्याच एका कारवाईत पोलिसांनी सात अग्निशस्त्र जप्त केले आहेत. तसेच ठाणे पोलिसांनी बुरहानपुर पोलिसांना याबाबत पत्र व्यवहार करून तेथे तयार केले जाणाऱ्या अग्निशस्त्रांच्या कारखान्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. सुमारे सात महिन्यांपूर्वी बुरहानपुरामधून आणलेला मोठा शस्त्रासाठा ठाणे पोलिसांनी जप्त केला होता. निवडणुकांपूर्वी अग्निशस्त्रे ठाण्यात येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

मध्य प्रदेशातील बुहरानपुर या भागातून अवैध शस्रसाठ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय गुरुचरण जुनेजा याला २३ फेब्रुवारीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने माणकोली भागातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे सात माऊजर पिस्तुल आणि १० काडतुसे जप्त केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने हा शस्त्रसाठा तो राहात असलेल्या बुरहानपुरा भागातून आणल्याचे समोर आले. तसेच त्याच्याविरोधात मध्यप्रदेशामध्ये शस्त्रास्र विक्रीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे मार्गात पोलिसांची तपासणी होऊ शकते. त्यामुळे त्याने भिवंडीत येण्यासाठी खासगी बसगाडीचा वापर केल्याचे समोर आले आहे. सुमारे सात महिन्यांपुर्वी ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे अन्वेषण शाखेने १७ पिस्तुल, ३१ मॅगझिन आणि १२ काडतुसे जप्त केले होते. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली होती. हा साठा देखील त्यांनी बुरहानपुर येथून आणला होता. अवैध शस्त्र विक्री प्रकरणात बुरहानपुर भाग समोर येत असल्याने तेथील पोलीस अधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी पत्र व्यवहार केला असून अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांवर आणि बनविण्याऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.

What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचा : मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय

अग्निशस्त्र खरेदी करण्यासाठी किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च करावे लागतात. तसेच हे शस्त्र वापरण्यासाठी संबंधित विभागातील पोलीस अधिकाऱ्यांकडून परवाना मिळवावा लागतो. परंतु बुरहानपुरमधील अनेक घरात शस्त्र तयार करण्याचे छोटे कारखाने आहेत. शस्त्रांची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांकडून हे शस्त्र खरेदी केले जातात. त्यानंतर ते शहराच्या ठिकाणी विक्री केले जातात. अवघ्या २० ते २५ हजार रुपयांत ही शस्त्र विक्री होत असल्याचे तपासात समोर आले आहे.