करोना महासाथीच्या दोन वर्षाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेतील २१ कामगारांचा कर्तव्यावर असताना करोनाची लागण होऊन मृत्यू झाला. अशा मृत कामगारांच्या वारसांना गेल्या वर्षी शासनाने ५० लाख रुपयांचे सानुग्रह साहाय्य अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन कल्याण डोंबिवली पालिकेतील करोनाने मृत २१ कामगारांच्या वारसांसाठी एकूण १० कोटी ५० लाख रुपयांची रक्कम शासनाकडून जमा झाली आहे.

हेही वाचा >>>ठाणे: रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू केले नाही म्हणून कंत्राटदाराला पालिकेची नोटीस

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश

राज्यातील १६ पालिकांमधील ७८ कर्मचारी करोना महासाथीच्या काळात करोनाची बाधा होऊन पालिकेत कर्तव्यावर असताना मरण पावले होते. यामध्ये कल्याण डोंबिवली पालिकेतील २१ कर्मचारी होते. अचानक आलेल्या करोना महासाथीवर मात करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेचे कर्मचारी करोना काळजी केंद्र, रुग्णवाहिका, घरोघरचे सर्व्हेक्षण, साफसफाई, रुग्णालयात सेवा देत होते. या कालावधीत कर्तव्यावर असताना अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होऊन हे कर्मचारी मरण पावले. कामावर असताना या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने शासनाने अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपये सानुग्रह साहाय्य अनुदान देण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला.

हेही वाचा >>>डोंबिवलीत दुचाकी स्वारांकडून अडीच लाखाचा सोन्याचा ऐवज लंपास

कल्याण डोंबिवली पालिकेने या कर्मचाऱ्यांची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठविली होती. करोना सानुग्रह अनुदानासाठीच्या याद्यांची शासन स्तरावर छाननी करण्यात आली. या यादीत शासनाच्या निकषात जे कर्मचारी ५० लाखाचे साहाय्य घेण्यासाठी पात्र आहेत. अशा कर्मचाऱ्यांची यादी आरोग्य विभागाने तयार केली. ही यादी नगरपरिषद प्रशासन संचालनाकडून पात्र अंतीम लाभार्थीं कामगारांची यादी कल्याण डोंबिवली पालिकेकडे पाठविण्यात आली आहे.

हेही वाचा >>>ठाण्यात आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून नव्या अधिकाऱ्यांची मोट बांधणी; उपायुक्त जोशी यांच्याकडून घनकचरा विभागाचा पदभार काढला

शासन आदेशाप्रमाणे मृत कामगारांच्या वारसांना कळवून त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्र तपासून वारसांना ५० लाखाची रक्कम दिली जाणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण डोंबिवली पालिकेतील मृत कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, चालक वाहक, संगणक चालक, लेखाधिकारी यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>ठाणे : अतिक्रमणावरील कारवाई टाळण्यासाठी महापालिकेच्या सफाई कामगाराने मागितली लाच

कडोंमपातील पात्र लाभार्थी
दिवंगत नीलेश घोणे, अनिल बाकडे, शिवाजी खरे, राजेश केंबुळकर, बबन मोहपे, संतोष खंबाळे, अनिता पवार, सुरेश कडलग, राजेंद्र तळेले, अशोक कांबळे, हुसेन कोलार, कोंडीबा पवार, संजय तडवी, रमेश नरे, बाळू ढेंगळे, वसंत पागी, अशोक पाटील, मंगेश जाधव, कालिदास वाळोद्रा, सुधाकर आठवले, रमेश पाटील.

“ करोना महासाथीत मरण पावलेल्या पालिका कामगारांच्या नावे सानुग्रह साहाय्य अनुदान पालिकेत प्राप्त झाले आहे. मृत कामगारांच्या वारसांची आवश्यक कागदपत्रे तपासून हा निधी संबंधितांना दिला जाणार आहे. ”-सत्यवान उबाळे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी,कडोंमपा