टिटवाळा या रेल्वे स्टेशनवरुन घरी जाणाऱ्या महिलेवर एका आरोपीने बलात्कार केला. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. त्यानंत पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपीला जेरबंद केलं आहे.

नेमकी काय घडली घटना?

टिटवाळा स्थानकात लोकल आल्यानंतर प्रवासी महिला त्यातून उतरली आणि घरी जात होती. त्याचवेळी तिच्यावर एका इसमाने बलात्कार केला. टिटवाळा रेल्वे स्टेशनजवळच हा प्रकार घडला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी काय सांगितलं?

फिर्यादी महिला टिटवाळा स्थानकातून ट्रॅकमधून चालत तिच्या घरी चालली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाला. आम्ही आरोपीला तातडीने अटक केली आहे असं एसीपी मनोज पाटील यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित महिला शहाड या ठिकाणी एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही महिला शहाड रेल्वे स्थानकावरुन लोकलने टिटवाळा स्थानकात उतरली. तिथून तिच्या घरी चालली होती. रुळावरुन जात असताना एकाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ही महिला फोनवर पतीशी बोलत होती त्यामुळे तिला मागे कुणी आलं आहे याचा अंदाज आला नाही. पाठलाग करणाऱ्या या इसमाने तिला रुळांजवळ असलेल्या झुडुपांमध्ये ओढून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडताना तिचा फोन सुरुच होता. घडल्या प्रकाराची वाच्यता केलीस तर तुला ठार करेन अशी धमकी आरोपीने तिला दिला. मात्र हा सगळा प्रकार या महिलेने तिच्या पतीला सांगितला.

पतीने शेजाऱ्यांना बरोबर घेतलं आणि तो तातडीने घटनास्थळी पोहचला. या प्रकरणी आरोपी निशांत चव्हाणला अटक करण्यात आली आहे. निशांत चव्हाण हा खासगी कंपनीत काम करतो अशी माहिती एसीपी मनोज पाटील यांनी दिली आहे.