भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण – वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने वाहनतळांची व्यवस्था पालिकेकडून केली जाते. या नियमाला बगल देऊन ठाकुर्लीत ९० फुटी या सध्या सर्वाधिक वर्दळीचा ठरलेल्या रस्त्यावर म्हसोबा चौकात कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने दूरसंवेदन पध्दतीने दुचाकींचे वाहनतळ सुरू केले आहे. अत्यंत दाटीवाटीच्या आणि वर्दळीच्या क्षेत्रात हे वाहनतळ उभे करण्यात आल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच काही वाहनचालकांनी यामुळे कोंडीत भर पडत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
nagpur drug smuggling, drug smuggling uganda via doha marathi news
युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

ठाकुर्ली, खंबाळपाडा ९० फुटी रस्ता भागात कल्याण डोंबिवली पालिकेची वाहनतळाची आरक्षणे होती. ही आरक्षणे पुढे वेगवेगळ्या विकसकांना बदल करत देण्यात आली. याविषयीच्या तक्रारी पालिकेत आहेत. ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागात नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. हा सर्व वर्ग दररोज ठाकुर्ली रेल्वे स्थानकात दुचाकीने येतो. त्यांना वाहने ठेवण्यासाठी ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागात एकही अधिकृत वाहनतळ नाही. ९० फुटी रस्त्याच्या दुतर्फा अलीकडे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून ठेवलेली असतात. म्हसोबा चौकात वळण रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने दुचाकी दोन रांगांमध्ये उभ्या असतात. घरडा सर्कल, ठाकुर्ली हनूमान मंदिराकडून येणाऱ्या वाहनांना अडथळा या दुचाकींचा अडथळा येत आहे. अशापद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे. असे असताना ९० फुटी रस्त्यावरील वर्दळीची जागेतच अजब पद्धतीने महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने दूरसंवेदन पध्दतीचे दिवे लावून स्मार्ट पार्किंग सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वाहनतळावर दुचाकी वाहन उभे केली की दूरसंवेदनातून लाल आणि बाहेर काढले की हिरव्या रंगाचा दिवा पेटतो. या वाहनतळावर सध्या मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहने उभी राहू लागली आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली मोठागाव खाडीत बेकायदा रेती उपसा- दिवस-रात्र सक्शन पंपाची धडधड

वाहनतळासाठी जागाच नाही

९० फुटी रस्त्यालगत वाहनतळांसाठी जागेचे नियोजन करण्यात कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास अपयश आले आहे. त्यामुळे या रस्त्यालगतच महापालिकेने अधिकृत वाहनतळाची परवानगी दिल्याने येथील वाहतूकीस या वाहनांचा मोठा अडथळा ठरु लागला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे प्रकल्प अभियंता तरूण जुनेजा यांना या विषया संदर्भात सतत दोन ते तीन दिवस संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मालमत्ता आणि वाहनतळासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधला. त्यांनी या विषयाशी आमचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान ९० फुटी रस्ता ही वाहनतळाची जागा नाही. या ठिकाणी रस्ता अडवून उभ्या केलेल्या दुचाकींविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ प्रशासकीय सुत्रांनी दिली. दरम्यान याविषयी नगररचना विभागाकडे संपर्क केला. त्यांनी या विषयाशी आमचा संबंध नसल्याचे सांगितले. स्मार्ट सिटी विभागाला संपर्क केला. तेथील अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काही मंडळी याठिकाणी नियमबाह्य वाहन चालकांकडून वसुली करत असल्याची शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

९० फुटी प्रशस्त असताना याठिकाणी पालिकेने रस्त्यावर दुचाकींचे वाहनतळ सुरू करून वाहतूक कोंडी आणि रस्त्याची शान घालविली आहे. पालिकेने हे वाहनतळ तातडीने बंद करावे. महेंद्र बोरचटे , रहिवासी.