बदलापूर : बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या गोरेगाव या गावातील एका नऊ वर्षाच्या मुलाची अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कुळगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. इबाद बुबेरे असे मृत मुलाचे नाव आहे. पैशांसाठी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर कर्जत राज्यमार्ग असलेल्या गोरेगाव गावात दोन दिवसांपूर्वी रमजान निमित्त मशिदीत नमाज पठणासाठी आलेला नऊ वर्षीय इबाद घरी परतला नाही. इबादच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. त्याचवेळी इबादच्या वडिलांना एका व्यक्तीने फोन करून तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवा असल्यास त्या बदल्यास २५ लाख रुपये द्या, असे सांगितले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचा फोन बंद केला. एकीकडे पोलिसांकडून इबादचा शोध सुरु होता. तर दुसरीकडे ग्रामस्थांकडून ही इबादचा शोध घेतला जात होता. त्याचवेळी अपहरणकर्त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड टाकून फोन करण्याच्या प्रयत्न केला.

हेही वाचा…कल्याणमधील गांधारी येथे ज्येष्ठ नागरिकासह कुटुंबियांना बेदम मारहाण

याचवेळी पोलिसांच्या रडारवर असलेल्या आरोपीचा पत्ता पोलिसांना कळला. त्या आधारे पोलिसांनी त्याच गावातील सलमान मौलवी याचा शोध सुरु केला. अधिक तपास केला असता याच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात गोणीत इबाद याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात कुळगाव बदलापूर पोलिसांनी सलमान, सफूयान यांच्यासह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidnapping and murder of nine year old boy at goregaon village of ambernath taluka psg
First published on: 25-03-2024 at 21:02 IST