कल्याण येथे चौघा जणांनी गोलू लल्लन या मजुराची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. रिमू, संजय, लालमन व भगत या संशयित मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. हे सर्व जण उत्तर प्रदेशातील असून गोलूही त्यांच्याच गावचा रहिवासी होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. गोलू त्यांच्याच समवेत राहत होता.