हजारो ग्राहकांचा ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभाग
‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवल’मधील दैनंदिन भाग्यवान विजेत्यांना टिप-टॉप प्लाझाचे रोहितभाई शहा यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. टिप-टॉप प्लाझामध्ये हा कार्यक्रम पार पडला. विजेत्यांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे ग्राहकांचा उत्साह वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेले २२ दिवस सुरू असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवल’ची सांगता १४ फेब्रुवारी रोजी झाली. या वर्षी हजारो ग्राहकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.
वीकएण्ड आणि सेकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून पितांबरी हे सहप्रायोजक आहेत. ट्रॅव्हल पार्टनर केसरी, बँकिंग पार्टनर युनियन बँक, वेलनेस पार्टनर यू आर फिटनेस्ट, हॉस्पिटॅलिटी पार्टनर द ग्रील हाऊस त्याचबरोबर टिप टॉप प्लाझा, कलाकृती, ऑरबिट, कॅरॉन किड्स हे असोसिएट पार्टनर आहेत.
तन्वीशता, वामन हरी पेठे सन्स, प्रशांत कॉर्नर, मॅक्रो फाइन हे पॉवरड् बाय प्रायोजक आहेत. तसेच अथर्व स्पीच अॅण्ड हिअरिंग केअर हे बंपर गिफ्ट पार्टनर आहेत. सरलाज् स्पा अॅण्ड सलून, ओमकार किचन वर्ल्ड, राजदीप इलेक्ट्रॉनिक, कलानिधी, एस. कुमार गोल्ड अॅण्ड डायमंड, चॉइस सारीस् अॅण्ड ड्रेस आणि द रेमण्ड शॉप हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत.
अगदी सुरुवातीपासून आम्ही या उपक्रमात सहभागी होत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’चे चोखंदळ वाचक दुकानांना भेटी देतात. ‘लोकसत्ता’च्या विश्वासार्हतेचा आम्हाला फायदाच होतो. त्यामुळे भविष्यातही अशा स्तुत्य उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.
– रोहितभाई शहा, टिप टॉप प्लाझा
१४ फेब्रुवारीच्या विजेत्यांची नावे..
१. प्रसाद शेटे- २० ग्रॅम चांदीचे नाणे आणि यू आर फिटनेस्टचे व्हाऊचर
२. ए.के. हसबनीस- यू आर फिटनेस्टचे व्हाऊचर
३. प्रियांका तापस- २० गॅ्रम चांदीचे नाणे
४. विद्या नामजोशी- रेमण्ड व्हाऊचर
५. प्रियेश शिवदास- २० ग्रॅम चांदीचे नाणे
विजेत्यांनी आपली पारितोषिके येत्या शुक्रवापर्यंत दुपारी २ ते ५ या वेळेत ‘लोकसत्ता ठाणे’ कार्यालयातून घेऊन जावीत.
पत्ता- दुसरा मजला, कुसुमांजली बिल्डिंग, कॉसमॉस बँकेच्या वर, नौपाडा, ठाणे (प.)