डोंबिवली- महावितरणचे देयक नियमित ऑनलाईन प्रणालीतून भरणाऱ्या डोंबिवलीतील अनेक वीज ग्राहकांना देयक भरणा करुनही देयक न भरणा केल्याचे लघुसंदेश आल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या प्रकरणाची सोडवणूक करण्यासाठी महावितरणच्या डोंबिवली एमआयडीसीतील कार्यालयात गेल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, अशा तक्रारी ग्राहकांनी केल्या.

डोंबिवलीतील बहुतांशी वीज ग्राहक ऑनलाईन प्रणालीतून वीज देयक भरणा करण्यावर भर देत आहेत. गेल्या महिन्यातील देयक अनेक वीज ग्राहकांनी ऑनलाईन प्रणालीतून भरणा केले. ते देयक महावितरणच्या खात्यात जमा झाले नाही. अशा ग्राहकांना महावितरणकडून देयक न भरणा केल्याचे संदेश आल्याने आणि देयक भरणा केल्याची ऑनलाईन पावतीही न मिळाल्याने ग्राहकांनी महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयात जाऊन विचारणा केली. तेथील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कारणामुळे असे प्रकार घडू शकतात. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन विचारणा करा. तुम्ही आम्हाला आमच्या मेलवर एक तक्रार पाठवा, अशा सूचना महावितरणचे अधिकारी ग्राहकांना करत आहेत. आम्ही प्रत्यक्ष तक्रारदार म्हणून उपस्थित आहोत. तुम्ही आमच्या समोर तक्रारीचे निराकरण करा.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता

हेही वाचा >>>कल्याण: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या डोंबिवलीतील तरुणाला सक्तमजुरीची शिक्षा

प्रत्येक ग्राहकाला मेल पाठविणे शक्य होईलच असे नाही, असे पीडित वीज ग्राहक श्रीकांत खुपेरकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला सांगितले. त्याने हतबलता व्यक्त करुन तुमचा मेल हा आमच्याकडे पुरावा राहील. त्याप्रमाणे कार्यवाही करणे शक्य होईल, असे सांगितले.उन्हाचे दिवस सुरू आहेत. घरात बसुन अंगाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत वीज देयक भरणा केला नाही म्हणून अचानक महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन घराचा वीज पुरवठा बंद केला तर काय करायचे अशी भीती ग्राहकांमध्ये आहे. डोंबिवलीतून दररोज एमआयडीसीतील महावितरणच्या कार्यालयात जाण्यासाठी १०० ते १२५ रुपये रिक्षा चालक येण्याच्या जाण्याच्या भाड्यासाठी घेतात. सर्वांना हे भाडे परवडत नाही. या प्रकारामुळे दररोज अनेक ग्राहकांना महावितरण कार्यालयात जाणे शक्य होत नाही. ही कामे बहुतांशी ज्येष्ठ नागरिक करतात. त्यांची या प्रकारामुळे सर्वाधिक ओढाताण होते.

हेही वाचा >>>कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून ३१ गर्दुल्ले, भिकाऱ्यांना अटक

एकीकडे महावितरणकडून ऑनलाईन वीज देयक भरणा करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्याचवेळी तांत्रिक चूक झाली की ती चूक दुरुस्त करण्यासाठी मात्र ग्राहकांना स्थानिक कर्मचारी हेलपाटे मारण्यास भाग पाडतात. याविषयीच गंभीर दखल महावितरणच्या कल्याण विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी घेण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.महावितरणच्या अधिकाऱ्याने तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडला आहे. ग्राहकांच्या तक्रारीची सोडवणूक केली जात आहे, असे सांगितले.