मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेत आहेत असं विधान मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं आहे. ठाण्यातील ‘गडकरी रंगायतन’ येथे दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पोंक्षे यांनी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिलेल्या एका अग्रलेखाची आठवण काढली. तसंच एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा उल्लेख केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगात रंगली दिवाळी’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ‘रंगाई’ या खास दिवाळी अंकाचं देखील प्रकाशन करण्यात आलं.

ठाकरे गटाला आणखी एक धक्का? दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? म्हणाल्या “लवकरच माझा…”

शरद पोंक्षे यांनी यावेळी सांगितलं की “करोनाच्या काळात २०२१ मध्ये माझ्या आयुष्यातील पहिलं पुस्तक ‘मी आणि नथुराम’ प्रकाशित झालं. ‘मी नथुराम गोडसे’ नाटक करत असताना बाळासाहेब ठाकरे ठामपणे नथुरामच्या पाठीशी उभे राहिले होते. १७ जुलै १९९८ रोजी त्यांनी ‘नथुराम बोलला तर काँग्रेसच्या पोटात का दुखतं?’ असा अग्रलेख ‘सामना’त लिहिला होता. तो अग्रलेख या पुस्तकात छापण्यात आला आहे”.

“ती बाळासाहेबांची शिवसेना आणि त्याचे आजचे प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. पुस्तकात आनंद दिघे कसे पाठीशी उभे राहिले, बाळासाहेबांनी ती लढाई कशी लढली आणि आमचं नाटक केंद्र सरकारविरोधातील लढाईत कसं जिंकलं याचे अनंत किस्से आहेत,” असंही शरद पोंक्षे यांनी सांगितलं.

“मी काही लेखक नाही, त्यामुळे माझे पुस्तक कोणी वाचेल असं वाटलं नव्हतं. पण हे बेस्ट सेलर पुस्तक ठरलं. दिवाळीपर्यंत १० आवृत्त्या संपल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिदेंची टोलेबाजी

“आपलं सगळं काही उघड असतं. कालपासून दिवाळीचे फटाके फुटत आहेत, पण आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले आहेत. त्याचा आवाज आजही घुमतोय. आमचे हितचिंतक आजही त्या फटक्याच्या आवाजांचं डेसिबल मोजत आहेत. त्यांनी मोजू देत, काही समस्या नाही,” असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला.