एका मराठी अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रज्ञा पारकर असे आहे. प्रज्ञाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून या चिठ्ठीवरुन तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा खुलासा झाला आहे.

अभिनेत्री प्रज्ञा पारकर (वय ४०) आपली मुलगी श्रृतीसह (वय १७) ठाण्यामधील कळवा येथे राहत होती. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञाकडे काही काम नव्हते तसेच तिच्या पतीच्या व्यवसायात हवी तशी प्रगती होत नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती, असे तिने लिहेलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रज्ञाने सकाळी आपला नवरा जिमला गेल्यानंतर प्रथम मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चेही जीवन संपवले. जेव्हा प्रज्ञाचा नवरा जिमवरुन परत आला तेव्हा त्याने घराचा दरवाजा आतून लॉक असल्याचे पाहिले. बराच वेळ वाट पाहूनही कोणी दार उघडत नसल्याने त्यांनी दारवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना धक्काच बसला, कारण घरात त्यांना प्रज्ञा आणि श्रृती मृतावस्थेत आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून प्रज्ञा यांनी हे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रज्ञाने काही मराठी मालिकांमध्ये तसेच एका मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले होते. परंतू, दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही.