लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: वनहक्क कायद्याप्रमाणे आदिवासी आणि बिगर आदिवासी त्यांच्या हक्काची जमीन मिळणे अपेक्षित असतानाही वन हक्क दावेदारांना जमिनी मिळालेले नाहीत. आदिवासींना कायद्याप्रमाणे जमीन मिळावी या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील शेकडो आदिवासी आणि श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले आहेत. वन जमिनीचा पुरावा घ्या आणि वन जमिनी नावे करा अशा घोषणा देत मोर्चेकरी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथूनजिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले आहेत.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब

ठाणे जिल्ह्यात आदिवासीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना वन जमिनी मिळणे अपेक्षित होते. या जमिनी मिळाव्यात यासाठी जिल्हास्तराव समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दाखल झालेल्या दाव्यांपैकी सुमारे 50 टक्के दावे अमान्य केले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा यावेळी आदिवासींनी काढला आहे. या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले आहेत