लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे: येथील रेमंड कंपनी व्यवस्थापनाने टेक्सटाईल्स कंपनी बंद करून त्याठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे. काही वर्षांनंतर त्याठिकाणी असलेल्या हेलिपॅडच्या जमिनीवरही प्रकल्प उभे राहू शकतात. अशावेळेस ठाणे जिल्ह्यात व शहरामध्ये दुर्घटना किंवा काही महत्वाच्या घटना घडल्यास हेलिपॅडची सुविधा मिळू शकणार नाही. त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी असलेल्या एअरफोर्सच्या मोकळ्या मैदानावर कायमस्वरूपी हेलिपॅडची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. काही वेळेस होणारे इमरजन्सी लँडिंग, राजकिय सभा, वाहतूक कोंडी समस्येमुळे एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये रूग्णाला नेण्यासाठी एअर अँब्युलन्सची सुविधा तसेच इतर अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी या हेलिपॅडचा फायदा ठाणेकरांना होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोखरण रोड नं. १, २ तसेच घोडबंदर रोडवर मोठ-मोठ्या उत्तुंग इमारती होत आहेत. पुढील १० ते १५ वर्षांमध्ये ही संख्या दुप्पटीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे शहराला लागूनच असलेल्या मुंबईमध्ये सांताक्रूझ येथील एअरपोर्ट येथे हेलिपॅडची सुविधा आहे. तसेच जुहू येथे पवनहाऊस, महालक्ष्मी रेसकोर्सवर तसेच राज्यपाल निवासामध्ये हेलिपॅडची सुविधा आहे. कफ परेड येथील एअरफोर्सच्या जागेमध्ये देखील हेलिपॅडची सुविधा असल्याचे समजते. परंतू, ठाणे शहरामध्ये रेमंड या बंद पडलेल्या टेक्सटाईल कंपनीच्या जागेवर विजयपथ सिंघानिया यांनी शाळेच्या बाजूला ही सुविधा स्वत:करिता निर्माण केलेली आहे. पण या सुविधेचा फायदा सिंघानिया परिवाराबरोबर सर्व राष्ट्रीय पक्षांना तसेच काही महत्वाच्या घटनांसाठी वापर होत असतो, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… कुंभारखाण पाड्यातील हरितपट्ट्यातील बेकायदा इमारतींवर कारवाई; राहुलनगर मधील भूमाफियांना नोटिसा

रेमंड व्यवस्थापनाने टेक्सटाईल्स कंपनी बंद करून त्याठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यास सुरूवात केली असून काही वर्षांनंतर त्याठिकाणी असलेल्या हेलिपॅडच्या जमिनीवरही प्रकल्प उभे राहू शकतात. अशा वेळेस ठाणे जिल्ह्यात व शहरामध्ये दुर्घटना किंवा काही महत्वाच्या घटना घडल्यास हेलिपॅडची सुविधा मिळू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पोखरण रोड नं. १ मधील येऊरच्या पायथ्याशी असलेल्या एअरफोर्सचे मोकळे मैदान आहे. संरक्षण खात्याची ही जागा उपलब्ध असून या ठिकाणी संरक्षण खात्याचे फायर रेंज आहे, तर काही ठिकाणी झोपड्यांचे अतिक्रमण झालेले आहे. या मोकळ्या मैदानावर जर कायमस्वरूपी हेलिपॅडची सुविधा निर्माण केली तर त्याचा फायदा येऊर येथील संरक्षण दलाच्या कामासाठी होऊन तेथील जागेचे संरक्षण होईल. अतिक्रमणापासून देखील त्याचा बचाव होईल. तसेच काही वेळेस होणारे इमरजन्सी लँडिंग, राजकिय सभा, वाहतूक कोंडी समस्येमुळे एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये रूग्णाला नेण्यासाठी एअर अँब्युलन्सची सुविधा तसेच इतर अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी या हेलिपॅडचा फायदा ठाणेकरांना होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. त्यात केंद्रामध्ये भाजपा -शिवसेना महायुतीचे सरकार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आपले अतिशय मित्रत्वाचे संबंध असून त्यांच्याकडे एक ठाणेकर म्हणून ही मागणी केली तर ते मान्य करतील, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.