डोंबिवली– उत्तर भारतीय वस्तीचे मोठे ठिकाण असलेल्या डोंबिवली पूर्व विभागातील सागाव चेरानगर भागातील दोनशेहून अधिक उत्तर भारतीय नागरिकांनी शनिवारी मनसेचे ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थित मनसेमध्ये प्रवेश केला. सागाव परिसर हा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अनेक वर्ष या भागातून शिवसेनेचा नगरसेवक कल्याण डोंबिवली पालिकेत निवडून जातो. या पक्षप्रवेशामुळे मूळ शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा >>> शाळा, महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त वाढवा ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे ठाणे पोलिसांना आदेश

शिवसेनेतील फुटीनंतर सागाव भागातील उत्तर भारतीयांना आपल्या गटात खेचण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असतानाच अचानक येथील उत्तर भारतीय नागरिकांनी मनसेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदुत्वाचा जयजयकार करत या नागरिकांना मनसेचे झेंडे देण्यात आले. मनसे कार्यालयात हा कार्यक्रम करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हे पक्षप्रवेश करत आहोत, असे उत्तर भारतीय संघटनेचे पदाधिकारी, नागरिकांनी सांगितले. यावेळी मनोज सिंग, राजकुमार सिंग, पवन शुक्ला, संदीप पांडे, योगेश पाटील, मनोज घरत, तुषार पाटील, रोहित भोईर, शरद पाटील, दिनेश पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष बांधणीसाठी शहराच्या विविध भागातील ज्ञाती संघटनांना आपल्या पक्षात घेण्याचे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात सागाव चेरानगर येथून केल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या नागरिकांनी मनसेत प्रवेश केला आहे. उत्तर भारतीय नागरिकांचे प्रश्न, नागरी प्रश्न सोडविण्यासाठी मनसे कटिबध्द असेल, असे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले.