कल्याण – मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावरील टिटवाळा रेल्वे स्थानक येथे शनिवारी सकाळी एका भरधाव मेलने दिलेल्या धडकेत एका मोटरमनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबद्दल मोटारमन संघटनेने हळहळ व्यक्त केली आहे. डी. के. नाग असे अपघातात मरण पावलेल्या मोटरमनचे नाव आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितले, मोटरमन नाग हे टिटवाळा येथील मोटरमन खोलीत निवासाला होते. शनिवारी सकाळची ६.४६ च्या टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलचे ते सारथ्य करणार होते. टिटवाळा लोकल सकाळी रेल्वे स्थानकात आल्यानंतर मोटरमन नाग हे त्या लोकलचा ताबा घेण्यासाठी रेल्वे मोटरमन निवासातून टिटवाळा रेल्वे स्थानकाकडे रेल्वे मार्गातून चालले होते. रेल्वे मार्ग ओलांडत असताना त्यांंना नाशिककडून मुंंबईकडे जाणारी गोरखपूर एक्सप्रेसची धडक बसली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी तत्काळ रेल्वे सुरक्षा जवान, रेल्वे स्थानक मास्तर यांनी पोहोचून ही माहिती वरिष्ठांना दिली.

हेही वाचा – सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी करणे पडले महागात, ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई

हेही वाचा – कल्याण शहर मनसेच्या महिला अध्यक्षा गॅस सिलेंडर स्फोटात गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाग यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला आहे, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.