लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : देशात २०२४ मध्ये मोदींच्या नावाचे वादळ येणार असून ते महाराष्ट्रातल्या इंडीया आघाडीला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी भिवंडी केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच २०२४ पर्यंत मुख्यमंत्री असतील आणि पुढच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातच लढल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

rohit pawar on devendra fadnavis god gift statement
“देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून…” रोहित पवारांची खोचक टीका!
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar
“शरद पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय केला”; चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ

राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ लोकसभा प्रवास या अभियानांतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी भिवंडी लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. त्यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपील पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘पुन्हा येईन’ असे भाष्य करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर शुक्रवारी प्रसारित झाली, त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ती चित्रफीत कुणीतरी उत्साही कार्यकर्त्यांने समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे असते, तर आम्ही आता नवीन चित्रफीत तयार केली असती. जुनी चित्रफीत कशाला शेअर केला असता, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-आगामी लोकसभेची निवडणूक ही संविधानाची निवडणूक – योगेन्द्र यादव

उद्धव ठाकरे यांनी जे कट कारस्थान करून मुख्यमंत्री पद मिळविले होते. त्याचे फळ त्यांना भोगावे लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी शिर्डी प्रवासात एका विशिष्ठ विषयावरून टीका केली, ती शरद पवार यांना झोंबली असावी. २०१९ मध्ये शरद पवार यांचा पक्ष राज्यात चौथ्या स्थानी होता. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपाला बहुमत मिळाले होते. परंतु भाजपाच्या आघाडीतील पक्षाला सोबत घेऊन बेकादेशीर महाविकास आघाडीचे सरकार बनविले. शरद पवार यांनी महायुती सरकारला बेकायदेशीर म्हणणे, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र करणे या वयात तरी शोभा देणारे नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भिवंडी येथील धामनकर नाका परिसरातील पद्मानगर भाजी मार्केट आणि कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई चौक ते लोकमान्य टिळक चौक पर्यंत ‘घर चलो अभियानात’ सहभागी होत जनतेशी संवाद साधला. भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व आणि भिंवडी पश्चिम तर कल्याण येथे शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून महाविजय २०२४ साकारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.