ठाणे जिल्ह्यातील किन्हवली ते शहापूर रस्त्यावर उंभ्रई गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण आणि विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराने नील गायीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये तरुण दुचाकीस्वार आणि नील गायीचा मृत्यू झाला आहे.

उंभ्रई गावाजवळ एका दुचाकीस्वाराची रस्ता पार करणाऱ्या नील गायीसोबत टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की दुचाकीस्वार आणि नील गाय रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला तर यात दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला. जखमी दुचाकीस्वाराला तात्काळ किन्हवलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर धडक बसलेल्या निल गाईचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला

मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव पंढरी बुधा वाघे (वय २०) असे असून तो डोळखांब जवळील जांभुळवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे. शहापूर तालुक्यात समृद्ध जंगल असून येथे नील गाईंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.