लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी तडीपारी संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना आठवड्याभरात त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

यासंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाणे पोलिसांनी सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण बंद करावे, राजकीय प्यादा सारखे वागू नये. राजकारणाचा पट कधीही बदलतो, अशी टिका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.