One dies in two wheeler accident Incidents around Wagle Estate thane news ysh 95 | Loksatta

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; वागळे इस्टेट परिसरातील घटना

ठाणे येथील मनोरुग्णालयाजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; वागळे इस्टेट परिसरातील घटना
( संग्रहित छायचित्र )

ठाणे: ठाणे येथील मनोरुग्णालयाजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. राजेश वाल्मिकी (४१) असे मृताचे नाव असून याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीकरांना ‘पालिका’च पाजते फुकट पाणी

मनोरुग्णालयाजवळील साठेवाडी भागात राजेश वाल्मिकी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. शनिवारी मध्यरात्री राजेश आणि मुलगा आदित्य (१६) हे दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिकांना आढळून आले. आदित्य हा बोलण्याच्या स्थितीत असल्याने त्याला अपघाताबद्दल विचारले असता, एका भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. राजेश यांना डाॅक्टरांनी तपासले असता, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर आदित्यवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 16:05 IST
Next Story
कल्याण-डोंबिवलीकरांना ‘पालिका’च पाजते फुकट पाणी