पर्यावरणाचे बदलते स्वरुप आणि त्याचा सामान्यांवर होणारा परिणाम, यामुळे वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत  आहे.त्याविषयी मत व्यक्त करणाऱ्या या प्रतिक्रिया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झाडे लावण्याचे संस्कार रुजतील..

झाडे लावण्यासारखे उपक्रम खरे तर आधीच करणे गरजेचे होते, परंतु आता हे उपक्रम राबविले जात आहेत हे खूप चांगले आहे. अशा उपक्रमांमुळे लहान मुलांच्या मनावरही झाडे लावण्याचे संस्कार रुजतील. परिसरात झाडे लावून परिसर हिरवेगार करण्या साठी आपण सतत तत्पर राहणे गरजेचे आहे.

– कविता कोळी, ठाणे</strong>

वृक्षारोपणातून निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न..

सिद्धिविनायक युवा संस्थेच्या माध्यमातून  यंदा महापालिकेच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबवणार असून या निमित्ताने टिटवाळा परिसरातील अमृतसिद्धी, ऊमीया कॉम्प्लेक्स, हरिओम व्हॅली या इमारतींच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करणार आहोत. केवळ महापालिकेच्या मदतीनेच नव्हे, तर आम्ही वेगळा निधी जमा करून सोसायटय़ांच्या परिसरात विविध फूल आणि फळझाडेही लावणार आहोत.

– संतोष जाधव, टिटवाळा

सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड..

आम्ही आमच्या सोसायटीच्या आवारात यापूर्वीही झाडे लावली आहेत. निवासी विभागात मोठय़ा प्रमाणात प्रदूषणाची समस्या जाणवत असल्याने येथील लोकांना तरी वृक्षांचे महत्त्व माहीत आहे.  फळ-फूल-झाडे, सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड आम्ही मिलापनगर येथील सव्‍‌र्हिस रोड परिसरात करणार आहोत.

– नीलम लाटकर, डोंबिवली

मिलापनगर परिसरात दोनशे झाडांचे रोपण..

यावर्षीच्या दुष्काळामुळे वृक्षांचे महत्त्व सर्वाना समजले. यामुळे यावर्षीपासून तरी प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला पाहिजे. मिलापनगर परिसरातील वंदे मातरम उद्यानात जांभूळ, वड, पिंपळ, कडुलिंब, आवळा, सारखी सुमारे दोनशेच्या वर झाडे लावणार आहोत.

– अनिरुद्ध महाडिक, डोंबिवली

झाडे लावण्यापेक्षा त्यांच्या संगोपनाची गरज..

परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे. याशिवाय नुसती झाडे लावून विषय संपत नाही. त्या झाडांची जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. झाडे लावल्यानंतर ती झाडे प्रत्येकाने किमान एक वर्ष दत्तक घेऊन त्यांची निगा राखाणे गरजेचे आहे. २ कोटी झाडे लावल्यानंतर त्यातील शंभरच झाडे जगली तर त्याचा फायदा होऊ शकणार नाही.

– हिमांशू जोशी, डोंबिवली

परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे. याशिवाय नुसती झाडे लावून विषय संपत नाही. त्या झाडांची जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. झाडे लावल्यानंतर ती झाडे प्रत्येकाने किमान एक वर्ष दत्तक घेऊन त्यांची निगा राखाणे गरजेचे आहे. २ कोटी झाडे लावल्यानंतर त्यातील शंभरच झाडे जगली तर त्याचा फायदा होऊ शकणार नाही.

– हिमांशू जोशी, डोंबिवली

वड, पिंपळाची झाडे लावणार..

पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असून तो सांभाळण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवण्याची गरज निर्माण झाली आहे.  वड, पिंपळ, कडुलिंब आदींसारखी झाडे लावल्याने हवा शुद्ध होते. तिसेच ही झाडे मोठी झाल्यावर भरपूर सावली मिळते. त्यामुळे वड, पिंपळ, कडुलिंब आदी झाडे लावण्याचा यंदा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

– रचना मुळे, डोंबिवली

दर तीन महिन्यांनी झाडे लावणे गरजेचे..

एक दिवस प्रचंड मोठय़ा प्रमाणात झाडे लावून काहीही होणार नाही. दर तीन महिन्यांनी झाडे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– अमोघ डोंगरे, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opinion on tree conservation
First published on: 01-07-2016 at 03:10 IST