कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहरात ऐन मोक्याच्या ठिकाणी वर्षांनुवर्षे भर रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या बांधकामांवर गेले काही दिवस कारवाई सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. वर्षांनुवर्षे भर बाजारपेठेतील रस्ते अतिक्रमणांमुळे आक्रसलेले होते. त्यांच्यावर कधी कारवाई होण्याची आशाही सर्वसामान्य नागरिकांनी सोडली होती. मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रशासनाची मानसिकता असेल तर काहीच अशक्य नसते, हेच या कारवाईने सिद्ध केले आहे. या तिन्ही शहरांमधील रस्त्यांनी या कारवाईमुळे मोकळा श्वास घेतला आहे..