ठाणे : मुंब्रा रोड जवळ गोवा राज्यात निर्मित केलेल्या भारतीय बनावटीचे विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत तब्ब्ल ८०० बॉक्स मद्याचा साठा आणि टेम्पो असा ६३ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वाहन चालक जुल्फेकार चौधरी याला अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग कोकण विभागाचे उपअधिक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक एक यांनी ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंब्रा रोड वरून गोवा निर्मिती भारतीय बनावटीची विदेशी मद्याची वाहतुक होणार असल्याची माहिती शुक्रवारी भरारी पथक क्रमांक एकला मिळाली होती. माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, आर. के. लब्दे, साहाय्यक दुय्यम निरीक्षक बी. जी. थोरात, जवान पी. ए. महाजन, एस. एस. यादव, एम. जी. शेख यांनी सापळा रचून सहाचाकी टेम्पोवर संशय आल्याने तो थांबविण्यात आला. त्यानंतर त्याची तपासणी केली असता, त्यात ८०० बॉक्स परराज्यातील भारतीय बनवाटीचे विदेशी मद्य (गोवा राज्य निर्मित) आढळून आले. दारुबंदी गुन्ह्या अंतर्गत ते जप्त करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेला सहा चाकी टेम्पोही जप्त करण्यात आला आहे अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.