मीरा रोड परिसरात सुरू असलेले सेक्स रॅकेट अनतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उद्ध्वस्त केले. या व्यवसायात अडकलेल्या तीन मुलींची पोलिसांनी सुटका केली असून दलाल म्हणून काम करणाऱ्या हेमा बोकाडिया या महिलेला अटक करण्यात आली आहे. या रॅकेटची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी बोगस गिऱ्हाईकाच्या माध्यमातून मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला.
प्रत्येक मुलीसाठी साडे तीन हजार असा एकंदर साडे दहा हजार रुपयांवर सौदा नक्की करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी मीरा रोड येथील व्हेजीस हॉटेलजवळ सापळा रचून हेमाला ताब्यात घेण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे तर अटक करण्यात आलेल्या महिलेला मीरा रोड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2015 रोजी प्रकाशित
मीरा रोड येथे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
मीरा रोड परिसरात सुरू असलेले सेक्स रॅकेट अनतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उद्ध्वस्त केले.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 31-10-2015 at 00:15 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police caught sex racket in mira road