भाईंदर, कल्याण भागांत कारवाई

मुंबईतील काही विभागांमध्ये अतिसाराच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य खात्याने जलजन्य आजारांना कारणीभूत ठरणारा बर्फ नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली असतानाच ठाणे, भाईंदर तसेच आसपासच्या परिसरात पुरवला जाणारा १२० किलो दूषित बर्फ आणि ५५ अखाद्य बर्फाचे तुकडे गोळा विक्रेत्यांनी बाळगल्याचे अन्न व औषध विभागाने उघडकीस आणले आहे. हा बर्फ मीरा रोड येथील खाडीत टाकून देण्यात आल्याची माहिती अन्न व औषध विभागाकडून देण्यात आली आहे.

१ मेपासून अन्न आणि औषधाच्या कोकण विभागातून ६७ हजार रुपयाचा बर्फ नष्ट करण्यात आला आहे. एकूण ९९ ठिकाणी बर्फाची तपासणी केली असून १८ ठिकाणाहून बर्फाचे नमुने घेतले आहे. त्यातील ठाणे जिल्ह्य़ात एकूण ८७ ठिकाणी तपासणी तसेच बर्फाचे १६ नमुने घेण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे न्यायनिवाडा अधिकारी सुरेश देशमुख यांनी दिली. ८ मेपर्यंत केलेल्या कारवाईत एकूण ११,५८८ किलो बर्फ जप्त केल्याची माहितीही त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हा बर्फ ठाणे, मीरा रोड, कल्याण, उल्हासनगर येथील रस्त्यावर बर्फाचा गोळा तसेच पन्हे, उसाचा रस विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून जप्त करण्यात आला आहे. हा बर्फ खाण्यायोग्य नसून तो कोणत्याही कंपनीमध्ये काम करताना वापरला जातो. मात्र हा बर्फ कमी कि मतीचा असल्याने बर्फाचा गोळा बनवण्यासाठी तसेच सरबतामध्ये वापरला जातो, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. मासे ठेवण्यासाठी वापरला जाणार बर्फही अखाद्य स्वरूपाचा वापरला जात असल्याची माहितीही सुरेश देशमुख यांनी दिली. त्यामुळे अशा बर्फावरही सध्या कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्य:स्थितीत ठाणे जिल्ह्यात बर्फाची तपासणी करण्यासाठी २७ अधिकारी कार्यरत असून रायगड जिल्ह्यासाठी सहा, रत्नागिरी जिल्ह्य़ासाठी १ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी १ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ठाण्यातही निकृष्ट बर्फ जप्त

खाण्यायोग्य नसून तो कोणत्याही कंपनीमध्ये काम करताना वापरला जातो. मात्र हा बर्फ कमी कि मतीचा असल्याने बर्फाचा गोळा बनवण्यासाठी तसेच सरबतामध्ये वापरला जातो, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. मासे ठेवण्यासाठी वापरला जाणार बर्फही अखाद्य स्वरूपाचा वापरला जात असल्याची माहितीही सुरेश देशमुख यांनी दिली. त्यामुळे अशा बर्फावरही सध्या कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्य:स्थितीत ठाणे जिल्ह्यात बर्फाची तपासणी करण्यासाठी २७ अधिकारी कार्यरत असून रायगड जिल्ह्यासाठी सहा, रत्नागिरी जिल्ह्य़ासाठी १ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी १ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तपासणी कशी होते?

हा बर्फ कोठून आणला आहे, बर्फ बनविण्यासाठी लागणारे पाणी कोठून आणले आहे, बर्फ विकत घेतल्यानंतर बर्फाची साठवणूक कोठे केली आहे, अशा प्रकारची तपासणी केली जाते. बर्फाची तपासणी करण्यास थोडा उशीर झाला. मात्र मुंबईत काही विभागात अतिसाराची साथ पसरल्याने ही तपासणी सुरू झाली आहे. यामध्ये कल्याण विभागातील कारवाई करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाची मदत घेतली आहे. तपासणीला दिलेल्या बर्फाचा निकालाचे अनुमान नमुना तपासणीला दिल्या दिवसापासून १४ दिवसांत येणे अपेक्षित आहे.

-सुरेश देशमुख, अन्न व औषध विभाग न्यायनिर्णय अधिकारी

मीरा रोडमध्ये साडेसहा हजार किलो दूषित बर्फ जप्त

मीरा रोड येथील बर्फ कंपनीवर छापा टाकून  ६ हजार ६०० किलो बर्फ जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन आणि मीरा-भाईंदर महापालिका यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मीरा रोड येथील डेल्टा रेफ्रिजरेशन या बर्फ कंपनीत परवाना नसताना अस्वच्छ जागेत आरोग्याला हानीकारक पद्धतीने बर्फ उत्पादन केला जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. या वेळी १३ हजार २०० रुपये किमतीचा ६ हजार ६०० किलो बर्फ जप्त करण्यात आला. हा बर्फ मासळी विक्रेते मासळी ठेवण्यासाठी तसेच बर्फ गोळा आणि सरबत विकणारे वापरत असल्याचे समजते.