मालमत्ता कर व पाणीपट्टी अभय योजनेस मुदतवाढ

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेस २१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेस २१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता करावरील तसेच थकीत पाणीपट्टी बिलामधील विलंब व प्रशासकीय आकारामध्ये ५० टक्के सूट देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेस २१ मार्चपर्यत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.
काही मालमत्ताधारकांची वार्षिक कर आकारणी थकीत राहिल्यामुळे प्रशासकीय आकारासह कर बजावण्यात आला होता. मात्र ही रक्कम भरणे शक्य होत नसल्याने प्रशासकीय आकार काही प्रमाणात माफ केल्यास नागरिकांकडून भरणा केला जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Property tax water tax abhay scheme extended

ताज्या बातम्या