जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोकण किनारपट्टीवर मुंबईसह सर्वच शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातही गुरूवारी पाऊस पडला मात्र त्याचे प्रमाण कमीच राहिले. त्यामुळे जिल्ह्यात अवग्या २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात संपूर्ण महिन्यात सरासरीच्या अवघे ३७ टक्के पाऊस पडला. गेल्या पाच दिवसात पावसाचे प्रमाण वाढले मात्र ते अत्यल्पच राहिले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

यंदाच्या वर्षात ठाणे जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. तर ठाणे जिल्ह्याच्या गेल्या दहा वर्षाच्या इतिहासात दुसऱ्यांदा निचांकी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जलस्त्रोतांमधील पाणीसाठ्यात विशेष भर पडलेली नाही. जून महिना संपूर्ण कोरडा केला. जून महिन्याच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसात पावसाचे प्रमाण काही अंशी वाढलेले दिसले. मात्र सरासरीच्या ते खूपच कमी होते. जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात सर्वाधिक ३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सर्वात कमी पावसाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली. मुरबाडमध्ये अवघ्या ३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल अंबरनाथ तालुक्यातही अवघ्या ९ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अवघे ३७ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पावसाची नोंद शहापूर तालुक्यात झाली आहे. शहापूर तालुक्यात सरासरीच्या ४५ टक्के पाऊस पडला. तर सर्वात कमी पावसाची नोंद कल्याण तालुक्यात झाली असून कल्याण तालुक्यात सरासरीच्या अवघ्या २८ टक्के पावसाची नोंद झाली.

heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर
Average temperature in Thane district at 42 degrees Celsius
मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर
500 houses collapsed in two days due to unseasonal rain in Yavatmal woman died due to lightning
यवतमाळात अवकाळीने दाणदाण; दोन दिवसांत ५०० घरांची पडझड, वीज कोसळून महिलेचा मृत्यू, तिघे गंभीर
nashik water crisis marathi news, nashik water dam marathi news,
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ३१ टक्क्यांवर

३० जून रोजी झालेला पाऊस (मि.मी.) –

ठाणे २६.९
कल्याण २३.३
मुरबाड ३.९
भिवंडी ३९.१
शहापूर २२.६
उल्हासनगर १८
अंबरनाथ ९.३
एकूण २१.९

जून महिन्यातला एकूण पाऊस –

तालुका पाऊस (मि.मी.) टक्केवारी
ठाणे – २०१.९ – ३९.१
कल्याण- १३७.८ – २८.९
मुरबाड – १८१.६ -४०.८
भिवंडी – १७०.७ – ३८
शहापूर – १९१.३ – ४५.३
उल्हासनगर – १४९.७ – ३८.९
अंबरनाथ- १४४.८-३६.६
एकूण-१७२.७- ३७.४