scorecardresearch

Premium

जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच; राज ठाकरे

जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे.

jarange patil and raj thackeray

ठाणे : जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच, असे सुचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी ठाण्यात केले. तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील आणि घाणेरडी असल्याचेही ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी ठाणे येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच, असे ते म्हणाले. ज्या विषयांमुळे तुम्ही त्रस्त असता. त्या विषयांपासून तुम्हाला भरकटवले जाते, अशी टिकाही त्यांनी केली. राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील आणि घाणेरडी झालेली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांची भिती वाटायला हवी. परंतु राजकीय पक्ष उघडपणे मतदारांना मुर्ख समजतात. पाच वर्ष खड्डे, बेरोजगारी या विषयावर बोलायचे आणि शेवटी मतदान करताना वेगळ्याच मुद्द्यावर मतदान करायचे असे मतदारांनी केल्यास त्यांची किमंत काय राहणार, मतदार नुसता सुशिक्षित असून नाही तर सूज्ञ असावा लागतो, असेही ते म्हणाले. 

deepak kesarkar s banner with retirement suggestions text appeared at various places in sindhudurg at vengurle taluka
सिंधुदुर्गात केसरकरांच्या विरोधात बॅनरबाजी; भाजप शिवसेनेतील बेबनाव चव्हाट्यावर
Sanjay Raut Slams BJP
“महाराष्ट्रात भाजपाच्या राजकीय कुंटणखान्याचा विस्तार, पण…”, संजय राऊत यांची टोलेबाजी
chhagan bhujbal
भुजबळांच्या बंडाची घोडदौड भाजपच्या दिशेने, ओबीसी आरक्षण लढाईतील वजिर कोण, प्यादे कोण ?
sanjay Raut Prakash ambedkar nana patole
“आमच्यात फार मतभेद…”, प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या मविआच्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील ठाकुर्लीत पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरी; आकर्षक पध्दतीने बैलांची सजावट

फटाके कधी लावायचे, सण कसे साजरे करायचे हे न्यायालय ठरविते. परंतु आदेशाचे पालन होते का याकडे न्यायालयाकडून लक्ष दिले जात नाही. मराठी पाट्यांच्या विरोधात येथील व्यापारी न्यायालयात जातात.  सर्वोच्च न्यायालयाने मराठी भाषेत पाट्या असाव्यात असा आदेश दिल्यानंतरही सरकारकडून त्यासंदर्भाची अमलबजावणी  होत नाही. त्यामुळे आता आम्हालाच आता काहीतर करावे लागेल असेही ते म्हणाले.  राम मंदिर दर्शानाचे नागरिकांना अमीष दाखविण्याऐवजी तुम्ही काय कामे केली ती जनतेसमोर दाखवा, अशी टिका त्यांनी अमित शाह यांच्यावर केली. वाजपेयी यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आताची भाजपची खूप वेगळी आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. धाडी जास्त काळ टिकणाऱ्या नसतात. त्या उलटून अंगावर येऊ शकतात, अशी टिका त्यांनी भाजपवर केली.

राष्ट्रवादीची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्यानंतर जातीयवाद सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश होण्यास वेळ लागणार नाही. यांच्या स्वार्थी राजकारणामुळे आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहोत. महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर होता. आता महाराष्ट्राची प्रतिमा वाईट करण्याचे काम सुरू होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray statement regarding jarange patil amy

First published on: 16-11-2023 at 15:41 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×