राज्य सरकारने पुढाकार घेऊन महिला सुरक्षेसाठी सुरू केलेल्या गुलाबी रिक्षांवर महिलांचालकांसाठी राखीव असलेल्या रिक्षां पुरुषांनाही चालविण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह महिला परवानाधारक करत आहेत.याविषयी वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरुषी सत्तेचा भाग
पुरुषी अहंकारामुळे महिलांच्या अधिकारावर वर्चस्व दाखवणे हे चुकीचे आहे. पुरुषी सत्तेचा हा एक भाग आहे. महिलांनी सर्व क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रिक्षा चालवण्यात घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा आहे.
– रेखा मैड, अंबरनाथ.

अबोली रिक्षा महिलांनीच चालवाव्यात..
एखाद्या महिलेला रिक्षा चालविता येत नसल्यास त्या महिलेच्या पाठी उभे राहावे आणि त्यांना रिक्षा चालविण्यास शिकवावे. यासाठी स्वत: महिलांनीही हिमतीने रिक्षा चालविणे गरजेचे आहे. महिला रिक्षा चालवून चरितार्थ करीत आहे हे पाहून अनेक महिला पूढे येतील.
– माधुरी पडियाल, डोंबिवली

महिलांच्या हक्कावरील वर्चस्व चुकीचेच
गुलाबी रंगाची रिक्षा असल्यावर महिला रिक्षाचालकच असणार याची खात्री असते. मात्र या ठिकाणीदेखील पुरुषांच्या वर्चस्वामुळे महिलांवर अन्याय होत असेल तर हे संतापजनक आहे. महिला रिक्षाचालकांनी या संदर्भात उठवलेला आवाज योग्यच आहे.
– अमृता लांजेकर, ठाणे.

आदर्श निर्माण व्हावा
महिलांनी रिक्षा चालवणे गरजेचे आहे. आपले परवाने पुरुषांना न देता स्वत: हिमतीने रिक्षा चालवण्याचा निर्धार करावा. यामुळे समाजासमोर आदर्श निर्माण होईल.
– अर्चना देसाई, डोंबिवली.

सक्षम बना..
प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या अबोली रिक्षाचे परवाने हा तर खरोखर चांगला उपक्रम आहे. महिला रिक्षा चालवते ही सगळ्यांसाठीच अभिमानाची बाब असते. रात्री-बेरात्री महिलांना या रिक्षाचालक महिलेची मदतही होऊ शकेल.
– राकेश म्हात्रे, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers opinion on pink auto rickshaws should also for man
First published on: 06-07-2016 at 00:16 IST