अंबरनाथ पूर्व विभागातील या प्रभागांमध्ये पालिकेतील सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि मनसे या तिन्ही पक्षांमध्ये कमी-अधिक प्रमाणात बंडखोरी झाली आहे. काही प्रभागांमध्ये तर प्रतिस्पध्र्यापेक्षा बंडखोरांनीच मोठे आव्हान उभे केलेले आहे. बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिला असला तरीही अनेक बंडखोरांवर कारवाई करणे सोयीस्कररीत्या टाळले आहे. त्यामागे ‘निवडून येईल तो आपला’ हेच धोरण असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
अंबरनाथमधील पूर्व विभाग हा प्रामुख्याने सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या पालिका निवडणुकीत या अभेद्य गडाला बरीच भगदाडे पडली. राज ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथे जोरदार मुसंडी मारत सेनेला धक्का दिला होता. ‘नमो’ लाटेमुळे विधानसभा निवडणुकीत ती हवा यंदा भाजपच्या शिडात दिसली होती. त्या लाटेच्या भरवशावर भाजप यंदा स्वबळावर सत्ता काबीज करण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. सेनेच्या तुलनेत भाजपची शहरातील संघटनात्मक ताकद कमी आहे. त्यामुळे लाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्या अन्य पक्षांतील पुढाऱ्यांच्या हाती कमळ देऊन भाजपने आपली संघटनात्मक ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या ‘आयाराम’ कार्यकर्त्यांना पक्षाने आयती तिकिटे दिल्याने नाराज भाजप पदाधिकाऱ्यांनी काही प्रभागांत बंड केले आहे. सेना व मनसेमध्येही तशीच परिस्थिती आहे.

अंबरनाथमधील प्रभागनिहाय लढती
* प्रभाग क्र. ३६- आंबेडकरनगर. माया कारंडे (भाजप), ताराबाई बोलढाणे (सेना), देवशाला मस्के (मनसे), अनिता शिंदे (राष्ट्रवादी), शामिका सूर्यवंशी (काँग्रेस).
* प्रभाग क्र. ३७- राणू गॅस गोडाऊन- आनंद पार्क परिसर. रेश्मा कांबळे (सेना), मीना पन्हाळे (भाजप), लता पाटील (मनसे), लक्ष्मी पाटील (राष्ट्रवादी), रेखा सूर्यवंशी (काँग्रेस).
* प्रभाग क्र. ३८- हरिओम पार्क. वंदना ठोंबरे (शिवसेना), रोहिणी भोईर (भाजप).
प्रभाग क्र. ३९- चिखलोली गांव- मोरिवली पाडा. सुरेखा सवर (शिवसेना), किरण शिंदे (भाजप), अन्य तीन अपक्ष.
* प्रभाग क्र. ४०- नवरेनगर परिसर. योगेश्वरी आहिरे (राष्ट्रवादी), मीना घाडगे (काँग्रेस), प्रज्ञा बनसोडे (सेना), ज्योती यादव (भाजप), सविता शिंदे (मनसे).
* प्रभाग क्र. ४१- रॉयल पार्क परिसर, रमेश गुंजाळ (शिवसेना), शशांक घोगरे (काँग्रेस), गोपाळ वानखेडे (राष्ट्रवादी).
* प्रभाग क्र. ४२- दुर्गादेवी मंदिर- बौद्धविहार- संतोषी माता मंदिर परिसर. प्रशांत उतेकर (काँग्रेस), बबन घावरे (मनसे), तानाजी पाटील (भाजप), राजेश शिर्के (सेना).
* प्रभाग क्र. ४३- महालक्ष्मीनगर. दत्ता उंबरे (काँग्रेस), सदाशिव पाटील (राष्ट्रवादी), प्रशांत फिरके (शिवसेना), संतोष शिंदे (भाजप), संदेश शेटे (मनसे).
* प्रभाग क्र. ४४- कृष्णनगर-वडवली. अरविंद मालुसरे (सेना), स्वप्निल बागुल (मनसे), शशिकांत झोमण (राष्ट्रवादी), प्रदीप जावीरकर (भाजप), सुभाष साळुंके आणि सूर्यकांत जाधव (सेना बंडखोर-अपक्ष).
* प्रभाग क्र. ४५- दत्तमंदिर वडवली विभाग. मालती पवार (सेना पुरस्कृत), उषा पाटील (राष्ट्रवादी), सुप्रिया देसाई (मनसे), लतिका कोतेकर (भाजप), शिल्पा नाचरे (सेना बंडखोर-अपक्ष), वैशाली बिरजे (भाजप बंडखोर).
* प्रभाग क्र. ४६- खेर सेक्शन- गोडबोले विभाग. वीणा उगले (सेना), रंजना गुंजाळ (भाजप), पूजा पवार (मनसे), विद्यावती पाटील (राष्ट्रवादी), संघजा मेश्राम (काँग्रेस), पल्लवी लकडे (अपक्ष)
* प्रभाग क्र. ४७- साई विभाग- सूर्योदय सोसायटी. अनिता आदक (भाजप), शुभदा काळे (काँग्रेस), दीपाली माळवदे (राष्ट्रवादी), स्मिता मोरे (शिवसेना).
* प्रभाग क्र. ४८- मोहनपूरम दत्तमंदिर परिसर. विद्या चव्हाण (सेना), कविता ठाकरे (राष्ट्रवादी), लीना धांडे (भाजप), अपर्णा भोईर (मनसे).
* प्रभाग क्र. ४९- कानसई गांव. भरत फुलोरे (भाजप), अशोक पाटील (काँग्रेस), चंद्रकांत भोईर (सेना), जयश्री भोईर (राष्ट्रवादी), सूर्यकांत भोईर (मनसे).
* प्रभाग क्र. ५०- शिवगंगानगर. पल्लवी शिरकर (सेना), रवींद्र पाटील (शिवसेना), सुजाता भोईर (भाजप), अविनाश सुरसे (मनसे).
* प्रभाग क्र. ५१- बाकरूचा पाडा- कातकरी वस्ती. वंदना पाटील (सेना), अनिता भोईर (भाजप).
* प्रभाग क्र. ५२- हनुमान मंदिर- शिवाजीनगर परिसर. संजय जाधव (राष्ट्रवादी), हिरालाल गुंजाळ (भाजप), पंढरीनाथ वारिंगे (सेना), संदीप लकडे (मनसे बंडखोर-अपक्ष).  
* प्रभाग क्र. ५३- गणेश मंदिर- शिवाजीनगर परिसर, पूर्णिमा कबरे (सेना), वैशाली घाडगे (राष्ट्रवादी), दीपाली नलावडे (मनसे), अनिता पवार (भाजप), सुनीता पाठारी (काँग्रेस), रेश्मा गुढेकर (अपक्ष-सेना बंडखोर).
* प्रभाग क्र. ५४- कैलासनगर- शिवाजीनगर. वंदना जगदेव (भाजप), पन्ना वारिंगे (सेना), शबाना शेख (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. ५५- प्रकाशनगर- बारकूचा पाडा. जयश्री पाटील (सेना), शेहनाज शेख (मनसे), श्वेता भोईर (भाजप).
* प्रभाग क्र. ५७- जांभिवली- फणशीपाडा. पंढरीनाथ पाटील (भाजप), बाळाराम पाटील (शिवसेना), सचिन पाटील (राष्ट्रवादी).

बदलापुरातील प्रभागनिहाय लढती
* प्रभाग क्रमांक २६
भाजप- सूरज मुठे
शिवसेना- संजय गायकवाड
अपक्ष- जयेश राऊत
* प्रभाग क्रमांक २७
भाजप- अविनाश पातकर
शिवसेना- शशिकांत पातकर
काँग्रेस- दत्तात्रय पोसम
राष्ट्रवादी- हेमंत यशवंतराव
अपक्ष- प्रभाकर पराष्टेकर
* प्रभाग क्रमांक २८
भाजप- तनुजा गोळे
शिवसेना- उमा पातकर
मनसे- स्नेहा फणसे
अपक्ष- विद्या आपटे
* प्रभाग क्रमांक २९
भाजप- संजय भोईर
शिवसेना- उल्हास आंबवणे
मनसे- विकास गुप्ते
काँग्रेस- श्रीपाद नाईक
राष्ट्रवादी- प्रमोद पवार
* प्रभाग क्रमांक ३०
भाजप- संभाजी शिंदे
शिवसेना- प्रशांत पालांडे
राष्ट्रवादी- पुंडलिक हिंदुराव
* प्रभाग क्रमांक ३१
भाजप- राजश्री घोरपडे
* प्रभाग क्रमांक ३२
भाजप- अर्चना जाधव
शिवसेना- नीलिमा पाटील
राष्ट्रवादी- पूजा शार्दूल
* प्रभाग क्रमांक ३४
भाजप- वैशाली गीते
* प्रभाग क्रमांक ३५
भाजप- वैशाली साखरे
शिवसेना- विजया राऊत
राष्ट्रवादी- लीला बागूल
* प्रभाग क्रमांक ३६
भाजप- शैलेंद्र गोसावी
शिवसेना- वामन म्हात्रे
* प्रभाग क्रमांक ३७
शिवसेना- शीतल राऊत
* प्रभाग क्रमांक ३८
भाजप- संगीता उदावंत
शिवसेना- वीणा म्हात्रे
* प्रभाग क्रमांक ३९
भाजप- वृषाली मेने
शिवसेना- नेहा आपटे
रासप- सुरेखा पालवे
अपक्ष- धनश्री गानू
* प्रभाग क्रमांक ४०
भाजप- सुधाकर मांजेरे
शिवसेना- मुकुंद भोईर
काँग्रेस- मुकेश बिरडे
राष्ट्रवादी- केतन शेळके
अपक्ष- प्रकाश धोत्रे
* प्रभाग क्रमांक ४१
भाजप- अश्विनी लाड
शिवसेना- प्रतीक्षा मरगज
* प्रभाग क्रमांक ४२
भाजप- मिलिंद नार्वेकर
शिवसेना- सानिका वडनेरे
रासप- अश्विन कुलकर्णी
* प्रभाग क्रमांक ४३
भाजप- हर्षदा सोळसे
शिवसेना- साक्षी भोसले
* प्रभाग क्रमांक ४४
भाजप- मीनल धुळे
शिवसेना- प्रतिभा जाधव
*प्रभाग क्रमांक ४५
भाजप- भागाराम भोसले
शिवसेना- अरुण सुरवळ
* प्रभाग क्रमांक ४६
शिवसेना- प्रतिभा गोरे
अपक्ष- शारदा सोनके
* प्रभाग क्रमांक ४७
भाजप- गजेंद्र गडगे
शिवसेना- चेतन धुळे
काँग्रेस- सतीश धुळे
राष्ट्रवादी- दिनेश धुमाळ