ठाणे, कल्याण- डोंबिवली शहरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या रिक्षा चोरणाऱ्या निमेश भवारे (२१) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरोधात ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण सात गुन्हे दाखल असून त्याला यातील पाच प्रकरणांमध्ये यापूर्वीही अटक होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>>ठाणे: घोडबंदर मार्गावर मेट्रो कामांसाठी मध्यरात्री वाहतूक बदल
कल्याण येथील टाटा पाॅवर हाऊस परिसरात एकजण चोरीची रिक्षा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मालमत्ता गुन्हे शोध कक्षाचे पोलीस हवालदार राजेंद्र घोलप यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून निमेश याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून एक रिक्षा जप्त केली. त्याची चौकशी केली असता, त्याच्याविरोधात ठाणे, कल्याण-डोंबिवली भागात विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.